मुंबई

शेअर्समधील लॉक-इन कालावधी संपताच झोमॅटोच्या शेअर्सची मोठी विक्री

सुरुवातीच्या व्यवहारात बीएसईमध्ये २९.७४ कोटी रुपयांचे ६०.८६ लाख इक्विटी शेअर्सचे व्यवहार झाले

वृत्तसंस्था

सोमवारी फूड डिलिव्हरी स्टार्टअप झोमॅटोचे समभाग सोमवारी दुपारपर्यंत ११.२८ टक्के घसरुन ४७.६० रुपये झाला होता. तत्पूर्वी, तो १४ टक्क्यांपर्यंत घसरुन ४६ रुपये प्रति शेअर या ५२ आठवड्यातील नीचांकी पातळीवर गेला होता. तर ५२ आठवड्यातील त्याचा उच्चांक १६९.१० रुपये होता. सोमवारी दुपारी कंपनीचे शेअर्स ४७.९० रुपये प्रति शेअर या दराने व्यवहार करत होते. नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या आकडेवारीनुसार, सोमवारी सकाळी झोमॅटोचे २३४.७५ कोटी रुपयांचे ४.८१ कोटी शेअर्स विकले गेले. त्याच वेळी, सुरुवातीच्या व्यवहारात बीएसईमध्ये २९.७४ कोटी रुपयांचे ६०.८६ लाख इक्विटी शेअर्सचे व्यवहार झाले.

कंपनीच्या आयपीओ पूर्वीच्या शेअर्समधील लॉक-इन कालावधी संपताच, कंपनीचे शेअर्स त्यांच्या सार्वकालिक नीचांकी पातळीवर पोहोचले. सोमवारच्या ट्रेडिंग सत्रात कंपनीचे एकूण मार्केट कॅप ३६,५०० कोटी रुपये होते, तर कंपनीचे मार्केट कॅप शिखराच्या वेळी १.३३ लाख कोटी रुपये होते. आकडेवारीनुसार, झोमॅटो कंपनीच्या शेअर्सच्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे आतापर्यंत अंदाजे९६,६०० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

सेबीच्या नियमांनुसार, कंपनीकडे ओळखण्यायोग्य प्रवर्तक नसल्यास, त्याचे प्री-आयपीओ शेअर्स १२ महिन्यांपर्यंत लॉक-इन कालावधीत राहतात. ही मुदत संपल्यानंतरच हे शेअर्स विकण्याची परवानगी दिली जाते. झोमॅटो कंपनीचा आयपीओ २३ जुलै २०२१ रोजी जारी झाल्यापासून, कंपनीचे ६१३ कोटी शेअर्स मागील एक वर्षापासून लॉक-इन कालावधीत होते. हे समभाग कंपनीच्या एकूण समभागांपैकी सुमारे ७८ टक्के आहेत. झोमॅटो शेअर्समधील लॉक-इन कालावधी संपल्यानंतर, युबेर बीव्ही, इन्फो एज ॲण्ड फिन सिंगापूर आणि अली पे सारख्या कंपन्यांमधील गुंतवणूकदार आता त्यांचे शेअरहोल्डिंग विकू शकतील. माहितीनुसार, यापैकी बहुतांश भागधारकांना कंपनीचे शेअर्स आयपीओ जारी होण्यापूर्वीच २० रुपये प्रति शेअर दराने जारी करण्यात आले होते. कंपनीचे प्रवर्तक, कर्मचारी आणि अशा सर्व भागधारकांचा लॉक-इन कालावधी ज्यांनी २१ जुलै २०२१ रोजी कंपनीच्या आयपीओपूर्वी कंपनीचे शेअर्स खरेदी केले होते.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना बंद होणार नाही; देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

वेतन श्रेणीच्या प्रशिक्षणासाठी अनुपस्थित शिक्षकांना दिलासा; ३ नोव्हेंबरपर्यंत प्रशिक्षण घेता येणार

एसटी प्रमाणपत्र पडताळणी प्रक्रियेत मोठे पाऊल; सहा आठवड्यांत चौकशी पूर्ण करत अहवाल सादर करणे बंधनकारक

जळगाववरून आता दररोज विमानसेवा सुरू; जळगाव-मुंबई आणि जळगाव-अहमदाबाद प्रवासी सेवा

कल्याणमध्ये उद्या पाणीपुरवठा ठप्प