आयआयटी मुंबईच्या ६२० संशोधकांना PHD; एकाच शैक्षणिक वर्षात गाठला संशोधनातील ऐतिहासिक टप्पा संग्रहित छायाचित्र
मुंबई

आयआयटी मुंबईच्या ६२० संशोधकांना PHD; एकाच शैक्षणिक वर्षात गाठला संशोधनातील ऐतिहासिक टप्पा

अभ्यस्त आणि शैक्षणिक क्षेत्रातील एक अभूतपूर्व टप्पा गाठत ' इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मुंबई'ने (आयआयटी मुंबई) २०२५-२६ या एकाच शैक्षणिक वर्षात तब्बल ६२० विद्यार्थ्यांना पीएचडी पदवी प्रदान केली आहे. एकाच वर्षात सर्वाधिक डॉक्टरेट पदव्या देण्याचा हा कोणत्याही आयआयटीचा आजवरचा नवा विक्रम ठरला आहे.

प्रतिनिधी

श्रेया जाचक/मुंबई

अभ्यस्त आणि शैक्षणिक क्षेत्रातील एक अभूतपूर्व टप्पा गाठत ' इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मुंबई'ने (आयआयटी मुंबई) २०२५-२६ या एकाच शैक्षणिक वर्षात तब्बल ६२० विद्यार्थ्यांना पीएचडी पदवी प्रदान केली आहे. एकाच वर्षात सर्वाधिक डॉक्टरेट पदव्या देण्याचा हा कोणत्याही आयआयटीचा आजवरचा नवा विक्रम ठरला आहे.

मागील पाच वर्षांत आयआयटी मुंबईच्या पीएचडी पदवीधरांची संख्या ३०० ते ५०० च्या दरम्यान होती. प्राध्यापकांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या ८ वर्षांपेक्षा जास्त काळ रखडलेल्या संशोधन प्रकल्पांचा विभागाने आढावा घेतला. रखडलेल्या १०० ते १२५ विद्यार्थ्यांच्या अडचणी समजून घेऊन त्यांना वेळेत संशोधन पूर्ण करण्यासाठी आवश्यक ते सहकार्य पुरवण्यात आले, तर ज्यांना पुढे जायचे नव्हते त्यांनी स्वतःहून माघार घेतली, ज्यामुळे या संख्येत वाढ झाली आहे. केंद्राच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे सचिव प्रा. उमेश वाघमारे हे मुख्य अतिथी उपस्थित होते. त्यांच्या हस्ते पदक वितरण सोहळा झाला. यावेळी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित प्रा. इमिरिटस जुझर वासी आणि माजी विद्यार्थी शशी शेखर वेमपती यांचा सत्कार करण्यात आला. आयआयटी मुंबईचे संचालक प्रा. शिरीष केदारे यांनी सर्व पदवीधरांचे व संशोधकांचे अभिनंदन केले. 'क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग २०२७'मध्ये जागतिक स्तरावर १३४ वे स्थान मिळवणारी

आयआयटी मुंबई ४० शैक्षणिक विभाग व २९ संशोधन केंद्रांच्या माध्यमातून संशोधनाचा विस्तार करत आहे.

प्रत्येकी २३ पीएचडी पदव्या

केवळ दोन दिवसांच्या ऑटम सोहळ्यात ३,०४२ विद्यार्थ्यांना ३,३३३ पदव्या देण्यात आल्या. यामध्ये ३५१ विद्यार्थ्यांना पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली. शरद ऋतूतील (ऑटम) ३५१ पीएचडी पदवीधरांमध्ये रसायनशास्त्र विभागाने सर्वाधिक ४७ पीएचडीसह अव्वल स्थान पटकावले. त्यापाठोपाठ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग (३०), मेकॅनिकल इंजिनिअरिंग (२७), बायोसायन्सेस अँड बायोइंजिनिअरिंग (२४) तसेच ह्युमॉनिटीज अँड सोशल सायन्सेस व मेटलर्जिकल इंजिनिअरिंगने प्रत्येकी २३ पीएचडी पदव्या नोंदवल्या.

प्रमुख पदक विजेते

समर परवेझ (बी.टेक, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग) याला राष्ट्रपती पदक, विघ्नेश जे. आर. (ड्युअल डिग्री, एरोस्पेस इंजिनिअरिंग) याला इन्स्टिट्यूट सुवर्णपदक तर निम्मा रामबाबू (सिव्हिल इंजिनिअरिंग) हिला डॉ. शंकर दयाळ शर्मा सुवर्णपदक देण्यात आले. याशिवाय ५० विद्यार्थ्यांना 'नाईक अँड रस्तोगी एक्सलन्स इन पीएचडी रिसर्च' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : गणपती आगमन मिरवणुकीला गालबोट! भुलेश्वरच्या राजाची मूर्ती कोसळून २ ठार, ५ जखमी; VIDEO

JNPT येथून पहिली 'डबल-स्टॅक लाँग-हॉल' कंटेनर ट्रेन धावली; ३६० टीईयू माल घेऊन ४२२ किमीचा प्रवास वेळ वाचणार; पोर्टवरील गर्दी कमी होणार

Mumbai : महापौर बंगल्यात काय बदल केला? ठाकरे सेना, काँग्रेस करणार पाहणी

आता कांदाही रडवणार; कांदा दरातील तेजी दोन महिने कायम राहण्याचा अंदाज

Mumbai : महापालिका शाळांच्या विद्यार्थ्यांची केशव सृष्टीतील शैक्षणिक सहल वादात