मध्य रेल्वे २०१२ उन्हाळी विशेष रेल्वे सेवा चालवणार; अतिरिक्त १२० विशेष गाड्या चालविण्याचे नियोजन 
मुंबई

मध्य रेल्वे २०१२ उन्हाळी विशेष रेल्वे सेवा चालवणार; अतिरिक्त १२० विशेष गाड्या चालविण्याचे नियोजन

प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने मुंबई, पुणे, सोलापूर, नाशिक रोड आणि नागपूर येथून विविध ठिकाणापर्यंत २०१२ उन्हाळी विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे.

Swapnil S

मुंबई : प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने मुंबई, पुणे, सोलापूर, नाशिक रोड आणि नागपूर येथून विविध ठिकाणापर्यंत २०१२ उन्हाळी विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. याव्यतिरिक्त आणखी १२० विशेष गाड्या मागणीनुसार चालवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यापैकी काही गाड्यांचे आरक्षण आजपासून सुरू झाले आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - मडगाव - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस साप्ताहिक विशेष गाडीच्या १८ सेवा चालविण्यात येतील. ट्रेन क्रमांक ०११७१ ही साप्ताहिक विशेष गाडी १६ एप्रिल ते ११ जून या कालावधीत सीएसएमटी येथून दर गुरुवारी रात्री १२.२० वाजता सुटेल आणि मडगाव येथे दुपारी ३.१५ वाजता पोहोचेल. या गाडीच्या ९ सेवा तर ट्रेन क्रमांक ०११७२ ही साप्ताहिक विशेष गाडी १६ एप्रिल ते ११ जून या कालावधीत मडगाव येथून दर गुरुवारी सायंकाळी ४ वाजता सुटेल आणि सीएसएमटी येथे पहाटे ३.४५ वाजता पोहोचेल. या गाडीच्या ९ सेवा चालविण्यात येतील.

लोटिट - मडगाव - लोटिट साप्ताहिक उन्हाळी विशेष गाड्याच्या १८ सेवा चालविण्यात येतील.१७ एप्रिल ते १२ जून या कलावधीत या गाड्या चालविण्यात येतील. अशा विविध सेवा चालविण्यात येणार आहेत.

३ एप्रिल ते १६ एप्रिल या कालावधीत १४ सेवा 'मागणीनुसार विशेष गाड्या' म्हणून, आणि १७ एप्रिल ते २ मे या कालावधीत १६ सेवा 'उन्हाळी विशेष गाड्या' म्हणून चालवण्यात येतील.

Mumbai : कोस्टल रोडवर उभारणार अत्याधुनिक बायो टॉयलेट; पालिका करणार ४ कोटी १९ लाख रुपये खर्च

भ्रष्ट कारभाराने निसर्गाची कत्तल; ठाणेकर उकाड्यात, यंत्रणा एसीत सुस्त; पारा ३८ अंशांवर, मध्यरात्रीही उष्णतेचा तडाखा

Mumbai : कमी कालावधीच्या सिग्नलमुळे पादचाऱ्यांचा जीव धोक्यात

मध्य रेल्वेची मालवाहतुकीतून ४,११७ कोटींची कमाई

Mumbai : ‘पार्टिसिपेट मुंबई’मुळे पालिकेला फायदा होणार का?