मुंबईजवळ तीन जहाजे पकडली; आंतरराष्ट्रीय तेल तस्करी रॅकेटचा केला पर्दाफाश 
मुंबई

मुंबईजवळ तीन जहाजे पकडली; आंतरराष्ट्रीय तेल तस्करी रॅकेटचा केला पर्दाफाश

मुंबईजवळ समुद्रात तेलाची तस्करी करणारी तीन भारतीय जहाजे तटरक्षक दलाने पकडली असून या जहाजांमध्ये मोठ्या प्रमाणात तेल साठा सापडला आहे. शुक्रवारी एका जटिल समुद्र-हवाई नेटवर्कच्या आधारे केलेल्या ऑपरेशनच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय तेल तस्करी रॅकेटचा पर्दाफाश केला आहे.

Swapnil S

मुंबई : भारतीय तटरक्षक दलाने मुंबईजवळ समुद्रात मोठी कारवाई केली आहे. तेलाची तस्करी करणारी तीन जहाजे तटरक्षक दलाने पकडली असून या जहाजांमध्ये मोठ्या प्रमाणात तेल साठा सापडला आहे. ही परदेशी जहाजे समुद्रात तेलाची तस्करी करत होती. शुक्रवारी एका जटिल समुद्र-हवाई नेटवर्कच्या आधारे केलेल्या ऑपरेशनच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय तेल तस्करी रॅकेटचा पर्दाफाश केला आहे.

रॅकेटचा भाग असलेल्या या जहाजांनी संघर्षग्रस्त देशांमधून मोठ्या प्रमाणात स्वस्त तेल आणि तेल आधारित वस्तूंची तस्करी करुन आर्थिक फायदा कमावण्याचा मार्ग निवडला होता. ही जहाजे आंतरराष्ट्रीय समुद्रात वस्तूंची देवाणघेवाण करायची. या सिंडिकेटमध्ये काम करणारे हस्तक अनेक देशांमध्ये सक्रिय आहेत. जहाजे खोल समुद्रात असताना त्यांच्यात समन्वय राखण्याचे काम हस्तकांकडून केले जात असे. मुंबईपासून जवळपास १०० नॉटिकल मैलांवर पश्चिम दिशेला गुरुवारी भारतीय तटरक्षक दलाने तीन जहाजे थांबवली. तटरक्षक दलाचे कर्मचारी या जहाजांवर गेले. त्यांची सर्वत्र झडती घेण्यात आली. कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. चालक, पथकाची चौकशी केली गेली. त्यातून जहाजांचा वापर तेलाच्या तस्करीसाठी होत असल्याचे स्पष्ट झाले.

सागरी राज्यांचा शुल्क चुकवण्याचा प्रयत्न भारतीय तटरक्षक दलाच्या टेक-इन्क्लुसिव्ह सिस्टिमने एका मोटर टँकरचा शोध घेतला. या टँकरच्या हालचाली संशयास्पद होत्या. त्यामुळे जहाजाच्या हालचालींचा डिजिटल तपास सुरु करण्यात आला. त्या जहाजांच्या आसपास असलेल्या अन्य जहाजांचा डेटा पॅटर्न तपासण्यात आला. दोन अन्य जहाजांवरील हालचालीदेखील संशयास्पद आढळून आल्या. त्यांच्याकडून समुद्रात तेलाशी संबंधित वस्तूंची तस्करी सुरु होती. ही जहाजे भारताच्या सागरी सीमा असलेल्या राज्यांमधील शुल्क चुकवण्याचा प्रयत्न करत होती.

जहाजांचे मालक परदेशी नागरिक

भारतीय तटरक्षक दलाच्या पथकाने जहाजांवर जाऊन डिजिटल पुरावे तपासले. त्यानंतर ही तीनही जहाजे ताब्यात घेण्यात आली. पुढील कारवाईसाठी या जहाजांना मुंबईत आणले जाणार आहे. या प्रकरणाचा पुढील तपास भारतीय सीमा शुल्क विभागाकडून केला जाईल. समुद्र किनारा लाभलेल्या राज्यांकडून कोणतीही कारवाई होऊ नये यासाठी जहाजांची ओळख वारंवार बदलली जायची. या जहाजांचे मालक परदेशी नागरिक आहेत.

OTP द्या, पाणी घ्या! टँकर बुकिंगसाठी BMC ची नवी डिजिटल प्रणाली अंतिम टप्प्यात; अनधिकृत पाणीउपसाला बसणार लगाम

ओमानजवळ व्यापारी जहाजावर क्षेपणास्त्र हल्ला; भारतीय नौदलाला इमर्जन्सी कॉल अन् MRCC च्या तत्परतेमुळे २४ भारतीय खलाशांची सुटका

Mumbai : दुसरी लाईफलाइन ठरतेय ‘काळ’...वर्षभरात ‘बेस्ट’च्या धडकेत ३२ जणांचा मृत्यू

साखरपुड्याच्या आनंदावर विरजण! जळगावात कार-एसटी-दुचाकीचा विचित्र अपघात, एकाच कुटुंबातील ५ जणांचा अंत, दुचाकीस्वारही ठार

मे महिन्यात ईव्ही विक्रीचा नवा विक्रम; देशात विजेवरील वाहनांच्या लोकप्रियतेत वाढ