मुंबई

जय भीम नगर कारवाईचा तपास एसआयटीकडे सोपवला, राज्य सरकारची उच्च न्यायालयात माहिती

उच्य न्यायालयाने फटकारल्यानंतर ताळ्यावर आलेल्या राज्य सरकारने जय भीम नगरचा तपास एसआयटीकडे सोपवण्यात आल्याची माहिती उच्च न्यायालयात दिली.

Swapnil S

मुंबई : पवईतील जय भीम नगरच्या झोपड्यांवर पावसाळ्यात करण्यात आलेल्या कारवाईचा तपास परस्पर साकी नाका पोलिसांकडे वर्ग करणाऱ्या राज्य सरकारने अखेर शरणागती पत्करली. उच्य न्यायालयाने फटकारल्यानंतर ताळ्यावर आलेल्या राज्य सरकारने जय भीम नगरचा तपास एसआयटीकडे सोपवण्यात आल्याची माहिती उच्च न्यायालयात दिली.

पवई येथील जयभीम नगरमधील शेकडो झोपड्यांवर ऐन पावसाळ्यात तोडक कारवाई करण्यात आली. या प्रकरणी रहिवाशांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल करत पालिका तसेच पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी केली.

तसेच भरपाई देण्याची विनंती याचिकेत केली. या याचिकेवर न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. या प्रकरणाचा तपास एसआयटीकडे सोपवण्यात आला आहे. अतिरिक्त पोलीस आयुक्त (गुन्हे) शशी कुमार मीना हे या विशेष तपास पथकाचे नेतृत्व करतील.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी