मुंबई

IT Raid On BBC Mumbai : दिल्लीनंतर बीबीसीच्या मुंबई कार्यालयावर आयटीची धाड

प्रतिनिधी

बीबीसीने (BBC) गुजरात दंगलीवर एक माहितीपट समोर आणला. यामध्ये तत्कालीन गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. यानंतर केंद्र सरकारने कारवाई करत या माहितीपटावर भारतात बंदी आणली. त्यानंतर आता दिल्ली पाठोपाठ मुंबईतील (IT Raid On BBC Mumbai) बीबीसीच्या कार्यालयावर आयकर विभागाने धड टाकली असून तब्बल ६० ते ७० अधिकाऱ्यांकडून झाडाझडती सुरु करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील बीकेसी कार्यालयामध्ये आयटीचे धाडसत्र सुरु झाले आहे. यावेळी कार्यालयामध्ये बाहेरच्या व्यक्तींना जाण्याची परवान्गी नाकारण्यात आली आहे. आज सकाळी हे धाडसत्र सुरु झाल्याचे सांगण्यात आले आहे. गेल्या काही महिन्यांपासून कार्यालयांमध्ये आर्थिक गैरव्यवहार होत असल्याची माहिती आयकर विभागाला देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. यावेळी बीबीसीच्या खात्यांसंबंधीची माहिती आयकर विभागातर्फे तपासली जात आहे. अधिकाऱ्यांनी बीबीसी कार्यालयातील अनेक संगणक ताब्यात घेतल्याचेही सांगण्यात आले आहे.

देशभरातून आयकर विभागाने सुरु केलेल्या या धाडसत्रावर विरोधकांकडून टीका करण्यात येत आहे. काँग्रेसने ट्विट करत म्हंटले की, "आधी बीबीसीच्या माहितीपटावर बंदी घालण्यात आली. आता बीबीसीवर आयटीची छापेमारी सुरु आहे. ही अघोषित आणीबाणी आहे." अशी गंभीर टीका केली आहे.

काँग्रेस नेते जयराम रमेश बीबीसी ऑफिसवर धाड पडल्यानंतर म्हणाले की, "अदानी प्रकरणावरून आम्ही जेपीसीची मागणी करत आहोत. आता सरकार बीबीसीच्या मागे लागली आहे. विनाश काले विपरीत बुद्धी," असे म्हणत केंद्र सरकारवर टीका केली.

काँग्रेसला मोठा धक्का! अरविंदर सिंग लवली यांचा दिल्लीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा; 'आप'सोबत युती केल्यामुळे नाराज

सरसंघचालक मोहन भागवत यांचे आरक्षणाच्या मुद्यावरून स्पष्टीकरण; "जोपर्यंत आरक्षणाची गरज..."

उज्ज्वल निकम यांना जळगावातून उमेदवारी द्यायला हवी होती - संजय राऊत

शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याबद्दल जनतेच्या मनात सहानुभूती - छगन भुजबळ

Loksabha Election 2024 : भाजपने उत्तर मध्य मुंबईतून उज्ज्वल निकम यांना दिली उमेदवारी; पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया