प्रातिनिधिक छायाचित्र  
मुंबई

Mumbai : कशेळी ते मुलुंड जलबोगद्याचा मार्ग मोकळा; बांधकाम प्रकल्पाला केंद्राच्या सीआरझेडची परवानगी

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्या ब्रिटिशकालीन असून त्या जीर्ण झाल्याने वारंवार पाणी गळतीचा सामना मुंबईला करावा लागतो. पाणी गळती रोखत मुंबईला सुरळीत पाणीपुरवठा करता यावा, यासाठी कशेळी ते मुलुंडदरम्यान जलबोगदा बांधण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Swapnil S

मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्या ब्रिटिशकालीन असून त्या जीर्ण झाल्याने वारंवार पाणी गळतीचा सामना मुंबईला करावा लागतो. पाणी गळती रोखत मुंबईला सुरळीत पाणीपुरवठा करता यावा, यासाठी कशेळी ते मुलुंडदरम्यान जलबोगदा बांधण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन व हवामान बदल (सीआरझेड) ची मंजुरी मिळाली आहे.

मोडक सागर, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा, भातसा, तानसा, विहार व तुळशी या सात धरणांतून मुंबईला दररोज ३९५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होतो. यापैकी दोन हजार दशलक्ष लिटर पाणीपुरवठा भातसा धरणातून होतो. भातसा धरणातून मुंबईला पुरवठा होणाऱ्या दोन हजार दशलक्ष लिटर पाण्यापैकी १३६५ दशलक्ष लिटर पाणी पांजरापूर जलशुद्धीकरण प्रकल्पात शुद्ध केले जाते. त्यानंतर ते जलवाहिनीने मुंबईला उपलब्ध होते. मात्र मुंबई- नाशिक महामार्गाच्या रुंदीकरणामुळे आणि सुरक्षित पाणीपुरवठ्याच्या दृष्टिकोनातून जमिनीवर कार्यान्वित असलेल्या मुख्य जलवाहिन्यांसाठी पर्यायी व्यवस्था करणे गरजेचे आहे. त्यासाठी कशेळी ते मुलुंड (जकात नाका) दरम्यान अतिरिक्त क्षमतेसह जलबोगदा बांधण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पाणीपुरवठ्यासाठी या जल बोगद्याचा वापर करण्यास सुरुवात करणार आहे. विद्यमान जलवाहिन्यांचे जाळे हे संरक्षित (बॅक-अप) म्हणून असेल. बोगद्यामुळे पाणीपुरवठ्यात वाढ होणार नसली तरी, प्रकल्पाचे मुख्य उद्दिष्ट्य पाणीपुरवठा जलवाहिनी सुरक्षित करणे आहे. ठाणे, पालघर, नाशिकमधून येणाऱ्या जलवाहिन्या या जमिनीवर आहेत. त्यांना जो धोका आहे. त्यामुळे हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर या बोगद्यातून पाणीपुरवठा करणे शक्य होणार आहे, असे पालिकेकडून सांगण्यात आले.

पंपिंग स्टेशनला सीआरझेडची मंजुरी

मुंबई महापालिकेकडून हाती घेण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील पिसे गावात ४५५ दशलक्ष लिटर क्षमतेचे पंपिंग स्टेशन उभारण्यात येणार आहे. या नवीन पिकअप वेअरच्या बांधकामासाठीच्या प्रकल्पाला केंद्राची सीआरझेड मंजुरी मिळाली आहे.

ठाण्यात मंगळवारपासून १२ दिवस २०% पाणी कपात; न्युटिक गेट दुरुस्तीमुळे पाणीपुरवठा कमी, बघा पाणी शटडाऊन वेळापत्रक

महाराष्ट्र सदन घोटाळा : मंत्री छगन भुजबळ यांची निर्दोष मुक्तता; ACBनंतर आता EDच्या प्रकरणातही दिलासा

Mumbai : सपा, राष्ट्रवादी गटाला समितीतही स्थान नाही; अजित पवारांच्या राष्ट्रवादीला एकच समिती; एमआयएमला लॉटरी

...तर पालिका आयुक्त, अधिकाऱ्यांचे पगार रोखू; हायकोर्टाची तंबी: प्रदूषण रोखण्यात BMC प्रशासन अपयशी!

भारत-न्यूझीलंड टी-२० मालिका : इशान, सूर्याचा झंझावात; न्यूझीलंडवर सहज मात; दुसऱ्या टी-२० सामन्यात भारताचा ७ गडी राखून शानदार विजय