'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
मुंबई

Mumbai : केनियन नागरिकाचे २५ वर्षे बेकायदा वास्तव्य

गेल्या २५ वर्षांपासून कोणत्याही वैध कागदपत्रांशिवाय भारतात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या एका केनियन नागरिकाला वाकोला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ओसिनो अँथनी ओमोन्डी (६१) असे या आरोपीचे नाव असून तो सांताक्रूझ (पूर्व) परिसरात राहत होता.

प्रतिनिधी

मेघा कुचिक/मुंबई

गेल्या २५ वर्षांपासून कोणत्याही वैध कागदपत्रांशिवाय भारतात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या एका केनियन नागरिकाला वाकोला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ओसिनो अँथनी ओमोन्डी (६१) असे या आरोपीचे नाव असून तो सांताक्रूझ (पूर्व) परिसरात राहत होता. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक वरुण बांडकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा केनियन नागरिक १९९१ मध्ये शिक्षणासाठी मुंबईत आला होता.

सन २००० मध्ये त्याने एलएलबी (कायद्याची पदवी) पूर्ण केली; मात्र, पदवी घेतल्यानंतरही तो व्हिसा किंवा वैध कागदपत्रांशिवाय भारतातच राहिला. ओमोन्डी हा मुंबई आणि भारताच्या इतर भागांत उपचारासाठी येणाऱ्या केनियन नागरिकांना मदत करायचा. त्यांना रुग्णालयात उपचार मिळवून देणे आणि औषधे उपलब्ध करून देणे, अशी कामे करून तो आपला उदरनिर्वाह चालवत होता. तो सांताक्रूझ पूर्वेकडील वाकोला, जवाहरलाल नेहरू रोडवरील बिस्मिल्ला सैदू चाळ येथे एकटाच राहत होता.

आतापर्यंतच्या तपासात त्याचा कोणत्याही गुन्हेगारी कृत्यात सहभाग असल्याचे पुरावे मिळालेले नाहीत. पोलिसांनी २९ मे रोजी दुपारी त्याला ताब्यात घेतले असून सध्या त्याची रवानगी सुधारगृहात करण्यात आली आहे. त्याला पुन्हा केनियाला पाठवण्याची कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. ही कारवाई वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक खराडे व त्यांच्या पथकाने केली.

राज्याच्या 'विधि व न्याय' विभागाच्या सचिवांना HC चा दणका; बजावली अवमान नोटीस, माफीनामाही फेटाळला

नवी मुंबई विमानतळावरून ३० लाख प्रवाशांचा प्रवास; ४६ शहरांशी हवाई जोडणीचा विस्तार

...तरच व्यापार करार! भारताला सवलतीचे दर द्या; केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांचा अमेरिकेला इशारा

Palghar : रेशनकार्ड काढून देण्यासाठी लाचेची मागणी; तहसील कर्मचाऱ्याला ACB ने रंगेहाथ पकडले

Mumbai : बीकेसी-कुर्ला मार्गावर डबलडेकर बस चालवणे अशक्य; उंचीमुळे १५० नवीन ईव्ही डबलडेकर बस पुन्हा रखडल्या