मुंबई

मालवणीत गरोदर महिलेवर चाकू हल्ला

केअर रुग्णालयात उपचार सुरू आहेत

नवशक्ती Web Desk

मुंबई - मालाडच्या मालवणी परिसरातील आठ महिन्यांच्या गरोदर महिलेवर तिच्याच परिचित व्यक्तीने चाकूने प्राणघातक हल्ला केला. यात नेहा कामरान कुरेशी ही महिला गंभीर जखमी झाली असून, तिच्यावर केअर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

याप्रकरणी नदीम इम्रान शेख ऊर्फ जिग्गू यास मालवणी पोलिसांनी अटक केली. ही घटना रविवारी सायंकाळी चार वाजता मालवणीत घडली. नेहा कुरेशी आठ महिन्यांची गरोदर आहे. याच परिसरात आरोपी नदीम राहतो. ते एकमेकांच्या परिचित आहेत. रविवारी सकाळी तिचा पती इकराम आणि दोन मुले कामरान आणि फुरकान हे नेहमीप्रमाणे कामावर निघून गेले. यावेळी घरात रुक्साना व तिची सून नेहा दोघेच होते. सायंकाळी चार वाजता त्यांच्या घरी नदीम आला. काही कळण्यापूर्वीच त्याने नेहाच्या चेहऱ्यावर, हातावर आणि पाठीवर चाकूने वार केले होते. यात ती गंभीर जखमी झाली होती. त्यानंतर नदीम पळून गेला. जखमी नेहाला स्थानिक रहिवाशांनी तातडीने मालवणीतील केअर रुग्णालयात दाखल केले. तिथेच तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. ही माहिती मिळताच मालवणी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती.

रुक्सानाच्या तक्रारीवरून पोलिसांनी नदीमविरुद्ध गंभीर दुखापतीसह हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंदविला होता. त्याला सोमवारी बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर केले. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. प्राथमिक तपासात नेहाचा पती कामरान आणि नदीमची पत्नी यांच्यात कथित अनैतिक संबंध असल्याचा तिला संशय होता. याबाबत तिने त्याच्याकडे विचारणा केल्यामुळे त्याचा नदीमला प्रचंड राग होता. त्यातून त्याने नेहावर हल्ला केल्याचे बोलले जाते. चौकशीनंतर हल्ल्यामागील कारण समजू शकेल, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चिमाजी आढाव यांनी सांगितले.

राज्याच्या EV धोरणाला अपवाद! बॉम्बे उच्च न्यायालयातील ६३ न्यायमूर्तींसाठी नवीन पेट्रोल-डिझेल गाड्यांना परवानगी

गणेशोत्सवासाठी एसटीच्या ५ हजार जादा बसेस; कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना दिलासा

कबुतरखाने तोडण्यास तात्पुरती मनाई; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश

शाडू मातीच्या मूर्ती आता होणार ‘ऑनलाइन’ उपलब्ध; पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी BMC चे विशेष प्रयत्न

गेटवे ऑफ इंडियाजवळ प्रवासी जेट्टीला परवानगी; परिसरात सुविधा पुरवताना खबरदारी घेण्याचे हायकोर्टाचे सरकारला निर्देश