मुंबई

Lalu Yadav Angioplasty: लालू यादव यांच्यावर मुंबईत अँजिओप्लास्टी

मागील काही दिवसांपासून आजारी असलेले राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांच्यावर बुधवारी मुंबईत अँजिओप्लास्टी करण्यात आली.

Swapnil S

मुंबई : मागील काही दिवसांपासून आजारी असलेले राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांच्यावर बुधवारी मुंबईत अँजिओप्लास्टी करण्यात आली. एशियन हार्ट इन्स्टिट्यूट येथे लालू प्रसाद यांना दाखल करण्यात आले आहे.

७६ वर्षीय लालू यादव यांच्यावर २०१४ मध्येही याच रुग्णालयात हृदयाशी निगडित आजारावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. सहा तास ही शस्त्रक्रिया सुरू होती. यावेळी त्यांच्या हृदयाचे वॉल्व्ह बदलण्यात आले होते. त्यानंतर दोनदा २०१८-१९ मध्ये ते तपासणीसाठी रुग्णालयाला दाखल झाले होते.

यावेळी लालू यादव यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली. डॉ. संतोष डोरा आणि डॉ. तिलक सुवर्णा यांनी त्यांच्यावर उपचार केले, असे सूत्रांनी सांगितले.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना बंद होणार नाही; देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

वेतन श्रेणीच्या प्रशिक्षणासाठी अनुपस्थित शिक्षकांना दिलासा; ३ नोव्हेंबरपर्यंत प्रशिक्षण घेता येणार

एसटी प्रमाणपत्र पडताळणी प्रक्रियेत मोठे पाऊल; सहा आठवड्यांत चौकशी पूर्ण करत अहवाल सादर करणे बंधनकारक

जळगाववरून आता दररोज विमानसेवा सुरू; जळगाव-मुंबई आणि जळगाव-अहमदाबाद प्रवासी सेवा

कल्याणमध्ये उद्या पाणीपुरवठा ठप्प