मुंबई

महेश मांजरेकर, मुक्ता बर्वे यांना व्ही. शांताराम पुरस्कार जाहीर; अनुपम खेर, काजोल देवगण यांना राज कपूर जीवनगौरव पुरस्कार

चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार, चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार, स्व. राज कपूर जीवनगौरव पुरस्कार, स्व. राज कपूर विशेष योगदान पुरस्कार तसेच गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार अशा पाच महत्त्वाच्या पुरस्कारांची घोषणा गुरुवारी सांस्कृतिक कार्यमंत्री ॲॅड. आशीष शेलार यांनी गुरुवारी केली.

Swapnil S

मुंबई : चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार, चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार, स्व. राज कपूर जीवनगौरव पुरस्कार, स्व. राज कपूर विशेष योगदान पुरस्कार तसेच गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार अशा पाच महत्त्वाच्या पुरस्कारांची घोषणा गुरुवारी सांस्कृतिक कार्यमंत्री ॲॅड. आशीष शेलार यांनी गुरुवारी केली. यावर्षीचा चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार नामवंत अभिनेता, दिग्दर्शक व निर्माते महेश मांजरेकर यांना तर चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार यंदा प्रसिद्ध अभिनेत्री मुक्ता बर्वे यांना जाहीर करण्यात आला आहे.

महेश मांजरेकर यांना १० लाख रोख रक्कम, स्मृतीचिन्ह, मानपत्र व चांदीचे पदक देऊन गौरवण्यात येईल. तसेच अभिनेत्री मुक्ता बर्वे यांना ६ लाख, स्मृतीचिन्ह, मानपत्र व चांदीचे पदक देऊन सन्मानित करण्यात येईल. हिंदी चित्रपटसृष्टीतील मानाचा स्व. राज कपूर जीवनगौरव पुरस्कार प्रख्यात अभिनेते अनुपम खेर यांना देण्यात येणार आहे. तर स्व. राज कपूर विशेष योगदान पुरस्कार यंदा अष्टपैलू अभिनेत्री काजोल देवगण यांना मिळणार आहे. या दोन्ही पुरस्कारांचे स्वरूप अनुक्रमे १० लाख व ६ लाखांचे आहे.

१९९३ पासून देण्यात येणारा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार यावर्षी मराठीतील ज्येष्ठ गझल गायक भीमराव पांचाळे यांना प्रदान करण्यात येणार आहे. हा पुरस्कार १० लाख रोख रक्कम, मानचिन्ह, मानपत्र व शाल यांसह दिला जातो. या सर्व पुरस्कारांचे वितरण २५ एप्रिल रोजी वरळी येथील ‘एनएससीआय डोम’ येथे एका भव्य समारंभात होणार आहे.

राज्यभरात संविधान जागर

संविधान अमृत महोत्सव आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य विभागातर्फे २० एप्रिल रोजी सायंकाळी ६:३० वाजता गेटवे ऑफ इंडिया येथे एक खास सांगितिक मानवंदना कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तसेच राज्यभरात संविधान जागर करण्यात येणार असल्याचे शेलार यांनी सांगितले. गेट वे ऑफ इंडिया येथे होणाऱ्या कार्यक्रमात सुरेश वाडकर, आदर्श शिंदे, वैशाली सामंत, उर्मिला धनगर, नंदेश उमप आदी कलाकार सहभागी होणार असून, संचालन सुबोध भावे करणार आहेत. कार्यक्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित गीते, नाट्यप्रवेश व नृत्य सादर केले जातील. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून, सन्मानिका प्रवेशपत्रे शिवाजी नाट्य मंदिर व रवींद्र नाट्य मंदिर येथे ‘प्रथम येणाऱ्यास प्राधान्य’ या तत्त्वावर वितरित केली जातील, अशी माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री शेलार यांनी दिली.

तेल कंपन्यांकडून इंधन गुणवत्ता तपासणीत मोठी वाढ; सोशल मीडियावरील चर्चेची इंधन वितरण कंपन्यांकडून खबरदारी

Mumbai : घराबाहेर खेळत असताना दोन मुलींचे अपहरण; पोलिसांनी उत्तराखंडमधून केली सुखरूप सुटका, आरोपी अटकेत

१५ वर्षांचा संसार संपला! आदिनाथ कोठारे-ऊर्मिला कानेटकर विभक्त; मुलीबाबत पोस्टमध्ये काय म्हटलं?

Driving Licence : १ ऑगस्टपासून ड्रायव्हिंग लायसन्ससाठी डोमिसाइल प्रमाणपत्र बंधनकारक होणार? जाणून घ्या नवे नियम

Mumbai Hit-and-Run : विरुद्ध दिशेने भरधाव येणाऱ्या दुचाकीने ९ वर्षीय मुलीला उडवले; चालक फरार, CCTV मध्ये घटना कैद