मुंबई

पॉलिटेक्निक प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर; १६ जूनपर्यंत विद्यार्थ्यांना करता येणार अर्ज

विद्यार्थ्यांना १६ जूनपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. या प्रवेशाची गुणवत्ता यादी २३ जून रोजी जाहीर करण्यात येणार आहे.

Swapnil S

मुंबई : दहावी परीक्षेच्या निकालानंतर तंत्रशिक्षण संचालनालयाने पॉलिटेक्निक प्रवेशाची प्रक्रिया २० मे पासून सुरु केली. त्यानुसार विद्यार्थ्यांना १६ जूनपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. या प्रवेशाची गुणवत्ता यादी २३ जून रोजी जाहीर करण्यात येणार आहे.

तीन वर्ष कालावधीच्या, पूर्णवेळ पोस्ट एसएससी पदविका अभियांत्रिकी व तंत्रज्ञान / वास्तुकला अभ्यासक्रम राबविणाऱ्या राज्यातील शासकीय, अनुदानित, विद्यापीठ संचालित व खाजगी विनाअनुदानित पदविका शैक्षणिक संस्थांच्या प्रथम वर्षाच्या प्रवेशप्रक्रियेसाठी ऑनलाईन अर्ज नोंदणी प्रक्रियेचे वेळापत्रक तंत्रशिक्षण संचालनालयाने जाहीर केले आहे. त्यानुसार विद्यार्थांना https://poly25.dtemaharashtra.gov.in/ या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज भरता येणार आहे. २० मे ते १६ जून या कालावधीत विद्यार्थ्यांना कागदपत्रांच्या स्कॅन छायाप्रती अपलोड करणे, कागदपत्रे पडताळणी करणे आणि अर्ज निश्चित करता येणार आहे.

कागदपत्रांची पडताळणी ऑनलाईन व प्रत्यक्ष दोन्ही पद्धतीने करता येणार आहे. १८ जून रोजी संकेतस्थळावर तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर होईल.

पॉलिटेक्निक प्रवेशाचे वेळापत्रक

-ऑनलाईन नोंदणी करणे, कागदपत्रांच्या स्कॅन छायाप्रती अपलोड करणे – २० मे ते १६ जून

-प्रवेशासाठी कागदपत्रांची पडताळणी आणि अर्ज भरल्याची निश्चिती करणे – २० मे ते १६ जून

-तात्पुरती गुणवत्ता यादी प्रदर्शित करणे – १८ जून

-गुणवत्ता यादीसंदर्भात हरकत सादर करणे –१९ ते २१ जून

-अंतिम गुणवत्ता याद्या प्रदर्शित करणे – २३ जून

अडचणी दूर करण्यासाठी हेल्पलाईन क्रमांक

प्रवेश अर्ज भरण्याबरोबरच प्रवेश प्रक्रियेमध्ये येणाऱ्या अडचणींबाबत विद्यार्थ्यांना काही तक्रार असल्यास ती दूर करण्यासाठी तंत्र शिक्षण संचालनालयाकडून ७६६९१००२५७/ १८००३१३२१६४ हा हेल्पलाईन क्रमांक सुरू करण्यात आला आहे. हा हेल्पलाईन क्रमांक सकाळी १० ते संध्याकाळी ६ या वेळेत सुरु राहणार आहे.

ठाण्यात नळजोडण्यांवरील ५००० स्मार्ट मीटर चोरीला; गेल्या आठ वर्षांतील घटना, झोपडपट्टीत सर्वाधिक चोरी

Pune : कुकडी प्रकल्पासाठी ५ हजार ७०४ कोटी रुपयांची तरतूद; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

Mira-Bhayandar : ५.१४ लाख मतदारांपैकी २.१३ लाख नोंदी बाद

दहशतवादाविरुद्ध लढ्याचे मोदींचे आवाहन; शांघाय सहकार्य संघटनेत पाकिस्तानवर जोरदार टीका

'सहा लाख' मतदार वगळले; २ लाख ७० हजार मतदारांचा 'पत्ता'च नसल्याचे उघड, निवडणूक विभागाचा दावा