विरारमधील जुने विवा कॉलेज येथे सुरू असलेल्या कै. भास्कर वामन ठाकूर चषक ५६व्या वरिष्ठ महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद कॅरम स्पर्धेच्या पुरुष एकेरी गटात मुंबईच्या विश्वविजेत्या प्रशांत मोरेने ठाण्याच्या झैद अहमदवर २५-३, १४-२५, १९-६ अशा अटीतटीच्या लढतीत मात करून आपले आव्हान कायम ठेवले. महिला एकेरीच्या उपउपांत्य फेरीत रत्नागिरीच्या आकांक्षा कदमने मुंबईच्या प्रीती खेडेकरवर चुरशीच्या लढतीत १६-१७, १६-१२, २०-१० उपांत्य फेरी गाठली.
पुरुष एकेरी उपउपांत्य फेरीचे इतर निकाल
महम्मद घुफ्रान (वि वि) संदीप देवरुखकर (मुंबई) २०-१०, २५-०. पंकज पवार (मुंबई) वि वि अभिषेक चव्हाण (रत्नागिरी) २५-७, २५-७. सिद्धांत वाडवलकर (मुंबई) वि वि महम्मद यासिन शेख (मुंबई उपनगर) ४-२४, १९-१७, २५-२३.
महिला एकेरी उपउपांत्य फेरीचे निकाल इतर निकाल
काजल कुमारी (मुंबई) वि वि प्राजक्ता नारायणकर (मुंबई उपनगर) १८-१७, ११-२४, १९-१५. ऐशा साजिद खान (मुंबई) वि वि अंजली सिरीपुरम (मुंबई) २२-६, २५-०. निलम घोडके (मुंबई) वि वि चैताली सुवारे (ठाणे) २५-०, २५-५.
वयस्कर पुरुष एकेरी उपांत्य फेरीचे निकाल
फय्याज शेख (पुणे) वि वि मनू बारिया
(मुंबई) २५-०, २५-५. संजय अडसूळ
(मुंबई) वि वि शब्बीर खान (मुंबई उपनगर) २५-१०, ६-२५, २२-१९.