(संग्रहित छायाचित्र)
मुंबई

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण: साध्वी प्रज्ञासिंगविरोधात विशेष NIA कोर्टाने जारी केले वॉरंट

Swapnil S

मुंबई : २००८ च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील मुख्य आरोपी भाजप खासदार साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर यांच्या अडचणीत आणखीन भर पडली आहे. न्यायालयाच्या आदेशानंतरही खटल्याच्या सुनावणीला गैरहजर राहणाऱ्या साध्वी यांच्याविरोधात विशेष एनआयए न्यायालयाने १० हजार रुपयांचे जामीनपात्र वॉरंट जारी केले आहे.

२९ सप्टेंबर २००८ मालेगावमधील एका मशिदीत बॉम्बस्फोट झाला होता. यात ७ जणांना आपले प्राण गमवावे लागले. याप्रकरणी लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित, रमेश उपाध्याय, समीर कुलकर्णी, सुधाकर चतुर्वेदी, सुधाकर द्विवेदी, अजय राहिरकर यांना अटक करण्यात आली होती. त्यापैकी अनेकजण सध्या जामिनावर बाहेर आहेत. हा खटला मुंबईतील विशेष एनआयएचे न्यायाधीश ए. के. लाहोटी यांच्यासमोर नियमित सुरू आहे.

गेल्या आठवड्यात न्यायाधीश लाहोटी यांनी प्रज्ञासिंग यांना कारवाईचा इशारा दिला होता. सुनावणीला व्यक्तिशः हजर न राहिल्यास कारवाई करू, अशी सक्त ताकीद दिली होती. त्यानंतरही सोमवारी प्रज्ञासिंग गैरहजर राहिल्या. प्रज्ञासिंग यांच्या वकिलांनी वैद्यकीय कारणास्तव सूट द्यावी, अशी विनंती करणारा अर्ज सादर केला; मात्र न्यायालयाने त्यांचा विनंती अर्ज फेटाळून लावत १० हजारांचा जामीनपात्र वॉरंट जारी केला.

या खटल्यात साध्वी प्रज्ञासिंग यांच्यासह एकूण १३ आरोपी असून, त्यातील ५ आरोपींची सुटका झाली आहे. प्रज्ञासिंग व अन्य सहा जणांविरोधात बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायदा (यूएपीए) व भारतीय दंड संहितेच्या तरतुदींखाली खटला सुरू आहे.

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस