मुंबई

मंगल प्रभात लोढा यांनी घेतली जखमी गोविंदाची भेट; वैयक्तिक पातळीवर १ लाखांची मदत

सूरज लवकरात लवकर बरा व्हावा यासाठी त्यांनी योग्य त्या सूचना दिल्या आहेत

नवशक्ती Web Desk

मुंबई : यंदा महाराष्ट्रासह मुंबई आणि उपनगर परिसरात मोठ्या उत्साहात दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला. नुकत्याच झालेल्या या दहीहंडी महोत्सवात सूरज कदम नावाच्या तरुण गोविंदास गंभीर दुखापत झाली होती. त्याला मणक्याला जबरदस्त दुखापत झाली आहे. केईएम रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. याबाबत माहिती मिळाल्यानंतर मुंबई उपनगरचे पालकमंत्री आणि राज्याचे कॅबिनेटमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे.

रविवारी मंगलप्रभात लोढा यांनी रुग्णालयात जाऊन, सूरज कदमची विचारपूस केली व त्याच्या तब्येतीची काळजी घेण्याच्या सूचना दिल्या. सूरजचा उत्तम इलाज व्हावा यासाठी डॉक्टरांशी देखील चर्चा केली आहे. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून सुरजला ५ लाख रुपयांची मदत, भाजपतर्फे करण्यात येणार असल्याचे लोढा यांनी यावेळी स्पष्ट केले आहे. त्याचबरोबर मंगल प्रभात लोढा यांनी सूरजला व्यक्तिगत पातळीवर १ लाखांची मदत देखील केली आहे. सूरज लवकरात लवकर बरा व्हावा यासाठी त्यांनी योग्य त्या सूचना दिल्या आहेत.

"व्हिडीओ पाहायला आमच्याकडे वेळ नाही"; CJP आंदोलकांच्या याचिकेवर सरन्यायाधीश सूर्य कांत यांचे भाष्य, तातडीच्या सुनावणीस नकार

Badlapur : साडी आणली नाही म्हणून थेट नवऱ्याचा घेतला जीव; पत्नी अटकेत

"जयंती म्हणून मानताना मन तुटून जातंय..."; अजितदादांच्या आठवणीत सुनेत्रा पवारांची भावनिक पोस्ट

Mumbai Rain Alert : मुंबईत मुसळधार पावसासह भरतीचाही धोका; वादळी वाऱ्याचा इशारा, नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

Mumbai : उड्डाणपूल, भुयारी मार्ग, स्कायवॉकचे जाळे विस्तारणार; महापालिका सल्लागाराची नियुक्ती करणार