मुंबई

मध्य रेल्वेवर आज मेगाब्लॉक; मुख्य आणि हार्बर मार्गावर ब्लॉक

मध्य रेल्वेच्या मुख्य आणि हार्बर मार्गावर विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी रविवारी मेगाब्लॉक घेण्यात आला आहे.

Swapnil S

मुंबई : मध्य रेल्वेच्या मुख्य आणि हार्बर मार्गावर विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी रविवारी मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. मुख्य मार्गावर माटुंगा ते मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गांवर सकाळी ११.०५ ते दुपारी ३.४५ वाजेपर्यंत ब्लॉक असेल. तर कुर्ला ते वाशी

दरम्यान अप आणि डाऊन हार्बर मार्गावर सकाळी १०.४० ते सायंकाळी ४.४० पर्यंत ब्लॉक घेण्यात आला आहे.

पश्चिम रेल्वे मार्गावर शनिवारी (ता.१०) मध्यरात्री मेगाब्लॉक घेण्यात आल्याने रविवारी दिवस कालीन ब्लॉक घेण्यात आलेला नाही.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.३६ ते दुपारी ३.१० वाजेपर्यंत सुटणाऱ्या डाऊन जलद मार्गावरील सेवा माटुंगा स्थानकावर डाऊन धीम्या मार्गावर वळवल्या जातील. या सेवा माटुंगा ते मुलुंड स्थानकांदरम्यान त्यांच्या संबंधित थांब्यांनुसार थांबतील आणि नियोजित वेळेपेक्षा १५ मिनिटे उशिराने पोहोचतील. तर ठाण्यापलीकडे जाणाऱ्या जलद गाड्या मुलुंड स्थानकावर डाऊन जलद मार्गावर पुन्हा वळवल्या जाणार आहेत. ठाणे येथून सकाळी ११.०३ ते दुपारी ३.३८ वाजेपर्यंत सुटणाऱ्या अप जलद मार्गावरील सेवा मुलुंड स्थानकावर डाऊन धीम्या मार्गावर वळवल्या जातील. या सेवा मुलुंड ते माटुंगा स्थानकांदरम्यान त्यांच्या संबंधित थांब्यांनुसार थांबतील.

पाणीही महागणार! BMC त पाणीपट्टीमध्ये वाढ करण्याच्या हालचाली; महसूलवाढीसाठी ६ ते ७ टक्क्यांपर्यंत वाढीची शक्यता, प्रस्ताव लवकरच आयुक्तांच्या मंजुरीसाठी

Mumbai : लालबाग, परळचे पदपथ झाले मोकळे; बेकायदा ओटे, कुंड्या, फलक, फर्निचर हटवले; सलग दोन दिवस केली कारवाई

'डीजे'विरोधात जनआक्रोश; हजारो पुणेकर रस्त्यावर; विद्यानंद बापटांच्या भूमिकेला दिला जाहीर पाठिंबा

दिल्लीत इमारत कोसळली; ४ ठार, ५ गंभीर

MPSC Paper Leak: ...तर आयोगातल्या व्यक्तीलाही शिक्षा; मुख्यमंत्र्यांचे आश्वासन