मुंबई : मध्य रेल्वेने रविवारी मुख्य मार्गावर मेगा ब्लॉक घेतला आहे. ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक राहणार नाही. हार्बर मार्गावर बेलापूर आणि पनवेल दरम्यान विशेष ट्रॅफिक ब्लॉक आहे.
मुख्य मार्गावर ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर १०.४० ते १५.४० वाजेपर्यंत ब्लॉक असेल. ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी ९.३४ ते दुपारी ३.०३ वाजेदरम्यान सुटणाऱ्या डाउन जलद, अर्ध जलद लोकल ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान डाउन धीम्या मार्गावर वळवल्या जातील. या लोकल त्यांच्या नियोजित थांब्यांबरोबरच कळवा, मुंब्रा आणि दिवा स्थानकांवरही थांबणार असून नियोजित वेळेपेक्षा १० मिनिटे उशिरा गंतव्य स्थानकावर पोहोचतील.
कल्याण येथून सकाळी १०.२८ ते दुपारी ३.४० वाजेदरम्यान सुटणाऱ्या अप जलद, अर्ध जलद लोकल कल्याण आणि ठाणे स्थानकांदरम्यान अप धीम्या मार्गावर वळवल्या जातील. या लोकल त्यांच्या नियोजित थांब्यांव्यतिरिक्त दिवा, मुंब्रा आणि कळवा स्थानकांवरही थांबतील. पुढे मुलुंड स्थानकावर पुन्हा अप जलद मार्गावर वळवल्या जातील. या गाड्या त्यांच्या नियोजित वेळेपेक्षा सुमारे १० मिनिटे उशिरा गंतव्य स्थानकावर पोहोचतील. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस व दादर येथून सुटणाऱ्या डाऊन मेल, एक्स्प्रेस गाड्या ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान ५व्या मार्गावरून वळवल्या जातील. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस व दादरकडे येणाऱ्या अप मेल, एक्स्प्रेस गाड्या कल्याण ते ठाणे, विक्रोळी दरम्यान ६व्या मार्गावरून वळवल्या जातील.
पनवेल लोकल बदलापूरपर्यंत
ब्लॉक कालावधीत डाउन उपनगरी गाड्या अंशतः रद्द करण्यात आल्या आहेत. त्यानुसार शनिवारी (ता. २२) रात्री १०.५० वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून पनवेलकरीता सुटणारी डाउन लोकल बेलापूर येथे अंशतः रद्द केली जाईल.
अप लोकल येथून सुटणार
पनवेल येथून सकाळी सुटणाऱ्या ९.२८ व ११.२८ वाजताच्या अप लोकल गाड्या पनवेल ऐवजी वाशी येथून चालविण्यात येतील.
पनवेल येथून ११.५२ वाजता सुटणारी अप लोकल बेलापूर येथून सुटेल.
शनिवार रात्रीची ठाणे पनवेल लोकल रद्द
शनिवारी रात्री ठाणे येथून रात्री १०.५५ वाजता पनवेलसाठी सुटणारी डाउन लोकल रद्द करण्यात आली आहे.
रविवारी सकाळच्या लोकल रद्द
रविवारी ठाणे येथून सकाळी ८.४१ वाजता आणि १०.०१ वाजता पनवेल करीता सुटणाऱ्या डाउन लोकल. ठाणे येथून सकाळी ९.०४ वाजता आणि ११.४२ वाजता नेरूळ करीता सुटणाऱ्या डाउन लोकल आणि ठाणे येथून सकाळी १०.२० वाजता वाशी करीता सुटणारी डाउन लोकल रद्द करण्यात आली आहे.
रविवारी रद्द होणाऱ्या लोकल
वाशी येथून सकाळी १०.५८ वाजता सुटणारी अप लोकल, नेरुळ येथून ०९.४२ वाजता सुटणारी अप लोकल आणि पनवेल येथून ०७.४३ वाजता, ०८.०४ वाजता, ०९.०१ वाजता, १०.४१ वाजता आणि ११.०२ वाजता सुटणारी अप लोकल रद्द करण्यात आल्या आहेत.
शेवटच्या डाऊन गाड्या
ब्लॉकपूर्वी डाउन हार्बर मार्गावर पनवेलसाठी शेवटची ट्रेन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून शनिवारी रात्री १२.४० वाजता सुटणारी पनवेल लोकल असेल.
ब्लॉकपूर्वी डाउन ट्रान्स-हार्बर मार्गावर पनवेल साठी शेवटची ट्रेन शनिवारी रात्री ११.१४ वाजता ठाणे येथून सुटेल.
ब्लॉकपूर्वी डाउन ट्रान्स -हार्बर मार्गावर बेलापूरसाठी शेवटची ट्रेन शनिवारी रात्री १२.०५ वाजता ठाणे येथून निघणारी ठाणे-बेलापूर लोकल असेल.
शेवटची अप गाडी
ब्लॉकपूर्वी अप हार्बर मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसाठी शेवटची ट्रेन पनवेल - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस लोकल असेल. ही लोकल पनवेल येथून पहाटे ४.४९ वाजता सुटेल. अप ट्रान्स-हार्बर मार्गावर ठाण्यासाठी शेवटची ट्रेन शनिवारी रात्री ११.१८ वाजता पनवेल येथून सुटेल.