मुंबई

मध्य रेल्वे प्रवाशांचे २ जूनपर्यंत 'मेगाहाल'; सीएसएमटीत ३६ तासांचा, तर ठाण्यात ६३ तासांचा विशेष ब्लॉक

ठाणे स्थानकातील प्लॅटफॉर्मच्या रूंदीकरणाच्या कामांसाठी मध्य रेल्वेने ३० आणि ३१ मे रोजीच्या मध्यरात्रीपासून ते २ जूनपर्यंत तब्बल ६३ तासांचा विशेष ब्लॉक जाहीर केला आहे.

Swapnil S

मुंबई : ठाणे स्थानकातील प्लॅटफॉर्मच्या रूंदीकरणाच्या कामांसाठी मध्य रेल्वेने ३० आणि ३१ मे रोजीच्या मध्यरात्रीपासून ते २ जूनपर्यंत तब्बल ६३ तासांचा विशेष ब्लॉक जाहीर केला आहे. तसेच सीएसएमटी रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म विस्तारीकरणासाठी ३० आणि ३१ मे रोजीच्या मध्यरात्री ते २ जूनच्या दुपारपर्यंत ३६ तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकमुळे मध्य रेल्वेच्या उपनगरीय मार्गावरील ९३० लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार आहेत. यामुळे प्रवाशांचे मेगाहाल होणार आहेत. त्यामुळेच प्रवाशांनी आपल्या प्रवासाचे योग्य नियोजन करूनच घराबाहेर पडावे, असे सुचवण्यात येत आहे.

मध्य रेल्वे मार्गावर घेण्यात आलेल्या या ब्लॉकमुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागणार आहे. त्यामुळे मध्य रेल्वेने सर्व आस्थापनांना याबाबत माहिती कळविली आहे. ब्लॉकच्या दिवशी प्रवाशांची संख्या कमी करण्यासाठी कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याची परवानगी द्यावी, असे आवाहन रेल्वेने केले आहे. ठाणे येथे डाऊन जलद मार्गावर ६३ तासांचा विशेष ब्लॉक घेण्यात आला आहे. तसेच अप स्लो लाईन : कळवा (सीएसएमटी एंड क्रॉसओव्हर्ससह) ते ठाणे (सर्व क्रॉसओव्हर्ससह), डाऊन फास्ट लाइनवर ठाणे (सर्व क्रॉसओव्हर्स) ते कळवा (सर्व क्रॉसओव्हर्ससह) आणि अप फास्ट लाईनवर कळवा (सर्व क्रॉसओव्हर्ससह) ते ठाणे (सर्व क्रॉसओव्हर्ससह) येथे कामे करण्यात येणार आहेत.

सीएसएमटी येथे ३६ तासांचा स्पेशल ब्लॉक घेण्यात आला आहे. ३० मे ते २ जून या कालावधीत हा ब्लॉक असेल. ब्लॉक कालावधीत डाऊन फास्ट लाइनवर गुरुवारी रात्री १२.३० ते ते २ जून दुपारी ३.३० पर्यंत ब्लॉक असेल. सीएसएमटी, वडाळा रोड अप आणि डाऊन हार्बर मार्ग तर सीएसएमटी आणि भायखळादरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर, तसेच सीएसएमटी भायखळादरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर ब्लॉक असेल.

गरज असेल तरच घराबाहेर पडा, मध्य रेल्वेचे आवाहन

  • शुक्रवारी १६१ लोकल रद्द

  • शनिवारी ५३४ लोकल रद्द

  • रविवारी २३५ लोकल रेल्वे रद्द करणार

  • ७२ लांब पल्ल्याच्या गाड्यांवर परिणाम

  • ३१३ लोकलचे प्रवासाचे अंतर कमी करणार

  • रविवारी १३१, १३९ लोकल अंतर कमी करणार

वर्क फ्रॉम होम द्या

तुमच्या कार्यालयातील कर्मचारी वर्ग मर्यादित ठेवावा, अशी विनंती आम्ही सर्व कंपन्यांना करत आहोत. तुमच्या कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होम’ करण्याची किंवा अन्य प्रकारे काम करण्याची सुविधा द्यावी. त्यामुळे प्रवाशांना सोयीचे होईल, असे आवाहन मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी स्वप्निल निला यांनी केले आहे. तसेच बेस्ट आणि एसटी महामंडळाला या तीन दिवसात अतिरिक्त बसेस चालवण्याचे आवाहनही रेल्वेने केले आहे.

ब्लॉक विभाग

- सीएसएमटी आणि वडाळा रोडदरम्यान अप आणि डाऊन हार्बर मार्ग

- सीएसएमटी आणि भायखळादरम्यान अप आणि डाऊन धीमा मार्ग

- सीएसएमटी आणि भायखळादरम्यान अप आणि डाऊन जलद मार्ग

मविआचा महानिक्काल, महायुतीच लाडकी; महायुतीला २३६ जागा, तर मविआला केवळ ४९ जागा

‘लाडकी बहीण’ योजना ठरली गेमचेंजर; देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार

झारखंडमध्ये ‘जेएमएम’च्या नेतृत्वाखालील सरकार; इंडिया आघाडीकडे बहुमत, भाजप दुसऱ्या क्रमांकावर

‘सिंह’ म्हातारा झालाय!

‘बटेंगे तो कटेंगे’, ओबीसीने भाजपला तारले