मुंबई

म्हाडाच्या कोकण मंडळाच्या लॉटरीचा धमाका!

म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या घरांची लॉटरी ८ ऑक्टोबर रोजी जाहीर होणार असतानाच म्हाडाच्या कोकण मंडळाच्या ८ हजार घरांची लॉटरी ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात काढण्यात येणार आहे. तर ३ ऑक्टोबरला ठाण्यातील...

Swapnil S

मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या घरांची लॉटरी ८ ऑक्टोबर रोजी जाहीर होणार असतानाच म्हाडाच्या कोकण मंडळाच्या ८ हजार घरांची लॉटरी ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात काढण्यात येणार आहे. तर ३ ऑक्टोबरला ठाण्यातील २० टक्के योजनेतील ९१३ घरांची प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य योजनेची जाहिरात काढण्यात येणार आहे. तसेच, ८ ऑक्टोबर रोजी म्हाडा योजनेतील ७ हजार घरांच्या लॉटरीची जाहिरात काढण्यात येणार आहे.

विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी राज्य सरकारच्या विविध विभागांकडून महत्वाच्या योजना जाहीर होऊ लागल्या आहेत. म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या लॉटरीनंतर कोकण मंडळाची लॉटरी काढण्याची तयारी अंतिम टप्प्यात पोचली आहे. मंडळामार्फत दोन लॉटरी काढण्यात येणार आहेत. यामध्ये प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या लॉटरीची जाहिरात ३ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. यामध्ये खासगी बिल्डरांकडून म्हाडाला प्राप्त झालेल्या ९१३ घरांचा समावेश करण्यात आला आहे. यात ठाणे, टिटवाळा, वसई परिसरातील घरांचा समावेश असेल. या घरांच्या किमती २० लाखांच्या जवळपास असल्याचे म्हाडातील सूत्रांनी सांगितले. तसेच कोकण मंडळाच्या विविध ठिकाणच्या ७ हजाराहून अधिक घरांच्या लॉटरीची जाहिरात ८ ऑक्टोबरला काढण्यात येणार आहे. यामुळे मुंबई महानगर क्षेत्रात घर घेऊ इच्छिणाऱ्या नागरिकांचे हक्काच्या घराचे स्वप्न प्रत्यक्षात येणार आहे.

Iran vs US-Israel War : युद्ध लवकरच संपणार! ट्रम्प यांचे संकेत; जगभरातील अर्थव्यवस्था, शेअर बाजारांवर सकारात्मक परिणाम

व्यावसायिक सिलिंडरच्या किमती १९५ रु. ने वाढल्या; घरगुती गॅसच्या दरात बदल नाही

Iran vs US-Israel War : इराणने ट्रम्प यांचा दावा फेटाळला

Mumbai : पुरेशा गॅसअभावी हॉटेल व्यवसायाच्या ‘चुली’ विझण्याच्या मार्गावर

आजचे राशिभविष्य, २ एप्रिल २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत