(संग्रहित छायाचित्र)
मुंबई

Mumbai : म्हाडाच्या १२० घरांची विक्री; ऑनलाइन नोंदणी ५ फेब्रुवारीला; 'असा' भरा अर्ज

म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या अखत्यारितील विविध वसाहतींमधील १२० घरांची ‘प्रथम येईल त्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावर विक्री करण्यात येणार आहे. यासाठी म्हाडाच्या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज नोंदणीची प्रक्रिया ५ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजेपासून सुरू होणार आहे.

Krantee V. Kale

मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या अखत्यारितील विविध वसाहतींमधील १२० घरांची ‘प्रथम येईल त्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावर विक्री करण्यात येणार आहे. यासाठी म्हाडाच्या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज नोंदणीची प्रक्रिया ५ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजेपासून सुरू होणार आहे. घरनिश्चिती प्रक्रिया १२ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजेपासून सुरू होणार आहे.

मुंबई मंडळामार्फत यापूर्वी काढण्यात आलेल्या लॉटरीमध्ये या घरांचा समावेश करण्यात आला होता. मात्र या घरांच्या किमती अधिक असल्याने या घरांची विक्री होऊ शकली नाही. या घरांची ‘प्रथम येईल त्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावर विक्री करण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे. त्यानुसार इच्छुक नागरिकांनी https://bookmyhome.mhada.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज नोंदणी करून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन म्हाडाकडून करण्यात आले आहे. अर्जदारांनी अर्ज करण्यासाठी म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रथम नोंदणी करणे आवश्यक आहे. ऑनलाइन अर्ज सादर करणे, अनामत रक्कम भरणे, अर्ज शुल्क भरणा, घर निश्चिती करणे या प्रक्रियेला १२ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजेपासून सुरुवात होणार आहे. घराच्या विक्री किमतीचा १० टक्के रकमेचा भरणा घर निश्चिती केल्यानंतर ४८ तासांच्या आत अर्जदाराने करणे आवश्यक आहे.

'प्रथम येईल त्यास प्रथम प्राधान्य' या तत्त्वावर मंडळाने बांधलेल्या शिंपोली कांदिवली येथील ८ घरे, चारकोप सेक्टर-८ कांदिवली येथील २ घरे, अँटॉप हिल-वडाळा येथील २७ घरे, तुंगा पवई येथील ४४ घरे, पीएमजीपी मानखुर्द येथील १ घर, मालवणी मालाड येथील १ घर, गायकवाड नगर मालवणी-मालाड येथील १ घर अशी ८४ घरे विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

तसेच विकास नियंत्रण नियमावली ३३(५) (७) अंतर्गत मंडळाला प्राप्त झालेल्या सदनिकांमधून घाटकोपर पूर्व येथील २ घरे, कन्नमवार नगर विक्रोळी येथील १ घर, अँटॉप हिल-वडाळा येथील ८ घरे, भायखळा येथील ६ घरे, ताडदेव येथील ६ घरे, लोअर परळ येथील ४ घरे, सायन येथील ०२ घरे, जेव्हीपीडी अंधेरी पश्चिम येथील ७ घरे अशी ३६ घरे विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

अर्ज सादर करावयाच्या दिवशी अर्जदाराचे वय १८ वर्षांपेक्षा कमी नसावे, अर्जदार हा भारतीय नागरिक असणे गरजेचे आहे. अर्जदार अविवाहित असल्यास स्वतःचे आधार कार्ड, पॅन कार्ड, अर्जदार विवाहित असल्यास पती-पत्नी यांचे आधार कार्ड, पॅन कार्ड, अर्जदार घटस्फोटित असल्यास सक्षम न्यायालयाच्या निकालाची प्रमाणित प्रत अथवा अपील दाखल असल्यास त्याची प्रत आवश्यक आहे. आरक्षण प्रवर्गाकरिता जातपडताळणी प्रमाणपत्र आवश्यक असून सदर प्रमाणपत्र नसल्यास जातीचा दाखला लागणार आहे.

असा भरा अर्ज

अनामत रकमेचा भरणा केल्यानंतर अर्जदारास बुक माय होमसाठी बटन दिसेल. त्यावर विंग/इमारत क्रमांक, घर क्रमांक, मजला याची माहिती उपलब्ध असेल. अनामत रकमेचा भरणा केल्यानंतर अर्ज फक्त पाहता येऊ शकेल. अर्जदाराने प्रिंटेड पावतीमधील माहिती वाचून बरोबर असल्याची खात्री करावी.

LPG सिलिंडर बुकिंग आता आणखी सोपं! व्हॉट्सॲप, मिस्ड कॉलपासून ॲपपर्यंत अनेक सुविधा उपलब्ध

मध्यपूर्वेतील संघर्षादरम्यान भारतात अडकलेल्या परदेशी नागरिकांना दिलासा; ३० दिवसांची व्हिसा मुदतवाढ, ओव्हरस्टे दंडही माफ

Mumbai : लोकल प्रवाशांसाठी सूचना; उद्या 'या' रेल्वे मार्गांवर मेगाब्लॉक, वाचा वेळापत्रक

एका दिवसात ४५ हजार गॅस सिलिंडरचे वितरण; ठाणे शिधावाटप विभागाचा दावा; घरगुती पुरवठा सुरळीत, व्यावसायिकवर तात्पुरती मर्यादा

मुंबईकरांनो सावधान, यंदा पावसाळ्यात समुद्राला उधाण; २४ दिवस समुद्रात उसळणार मोठ्या लाटा