तेजस वाघमारे : मुंबई
दक्षिण मुंबईतील उपकरप्राप्त इमारतींचा पुनर्विकास अनेक विकासकांनी बऱ्याच वर्षांपासून रखडवलेला आहे. रखडलेले ८ प्रकल्प ताब्यात घेऊन ते पूर्ण करण्यास सरकारने मान्यता दिल्यानुसार म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाने ५ प्रकल्पांची भूसंपादन प्रक्रिया पूर्ण करत हे प्रकल्प आपल्या ताब्यात घेतले आहेत. हे प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी लवकरच निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. या कारवाईमुळे प्रकल्प रखडवलेल्या ४० विकासकांनी पुन्हा इमारत पुनर्विकासाचे काम सुरू केले आहे.
मुंबई शहरात विकासकांनी अनेक वर्षांपासून शेकडो प्रकल्प रखडवले आहेत. यामुळे रहिवाशांना अनेक संकटांना सामोरे जावे लागत आहे. विकासक इमारतीचे बांधकाम करण्यास पुढे येत नसल्याने रहिवाशी हतबल झाले होते. रखडवलेले प्रकल्प मार्गी लावण्यासाठी गृहनिर्माण विभागाने २२ ऑगस्ट २०२३ मध्ये शासन निर्णय काढला आहे. या निर्णयानुसार प्रकल्प रखडविणाऱ्या विकासकांना प्रकल्पाचे काम सहा महिन्यांत सुरू करावे लागते. विकासकाने सहा महिन्यांत प्रकल्प सुरू न केल्यास गृहनिर्माण संस्थेला प्रकल्पाचे काम सुरू करण्याची संधी देण्यात येते. संस्थाही प्रकल्प मार्गी लावण्यात अपयशी ठरल्यास म्हाडाला प्रकल्प ताब्यात घेऊन तो पूर्ण करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत.
त्यानुसार मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाने प्रकल्प रखडविणाऱ्या ९१ विकासकांना नोटिसा दिल्या होत्या. त्यानुसार विकासकांची सुनावणी घेण्यात आली. सुनावणीनंतर मंडळाने सरकारकडे १३ प्रकल्पांचे भूसंपादन करण्याची परवानगी गृहनिर्माण विभागाकडे मागितली होती. त्यानुसार गृहनिर्माण विभागाने ८ प्रकल्पाचे भूसंपादन करून प्रकल्प राबविण्यास म्हाडाला परवानगी दिली होती.
यापूर्वीच्या विकासकांना मोबदला देण्याबाबत उच्च स्तरीय अधिकाऱ्यांसोबत बैठक होणार आहे. यानंतर या इमारतींच्या पुनर्विकासासाठी निविदा मागविण्यात येणार असल्याचे म्हाडातील उच्च पदस्थ अधिकाऱ्याने सांगितले.
कारवाईमुळे विकासकांचे दणाणले धाबे
मंडळाने आक्रमक भूमिका घेतल्याने सुमारे ४० विकासकांचे धाबे दणाणले. त्यांनी रखडवलेल्या प्रकल्पांचे काम सुरू केले असल्याचे मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांने सांगितले.
एकूण १३ प्रकल्पांचे प्रस्ताव मंजुरीसाठी
राज्य सरकारकडे मंडळाने १३ प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवले होते. त्यापैकी ८ प्रकल्पांचे भूसंपादन करण्यास गृहनिर्माण विभागाने परवानगी दिली आहे. ५ प्रकल्प म्हाडाने ताब्यात घेतले असून ३ प्रकल्प ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे मंडळातील अधिकाऱ्याने सांगितले.
कारवाईमुळे विकासकांचे दणाणले धाबे
मंडळाने आक्रमक भूमिका घेतल्याने सुमारे ४० विकासकांचे धाबे दणाणले. त्यांनी रखडवलेल्या प्रकल्पांचे काम सुरू केले असल्याचे मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांने सांगितले. एकूण १३ प्रकल्पांचे प्रस्ताव मंजुरीसाठी राज्य सरकारकडे म