मुंबई

म्हाडा घरे उभारण्यापूर्वी ग्राहकांची मागणी जाणून घेणार; घरे विक्रीविना पडून असल्याने घेतला निर्णय स्वतंत्र सॉफ्टवेअर तयार

म्हाडाच्या विविध मंडळांमार्फत राज्यभरात उभारण्यात आलेल्या घरांकडे ग्राहकांनी पाठ फिरवली आहे. यामुळे हजारो घरे विक्रीविना पडून असल्याने म्हाडाचा तब्बल ३ हजार कोटींची निधी यामध्ये गुंतला आहे. यामुळे म्हाडाने नवीन इमारत प्रकल्पाचे काम सुरू करण्यापूर्वी ग्राहकांची मागणी जाणून घेण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी म्हाडाने स्वतंत्र सॉफ्टवेअर तयार केले आहे.

Swapnil S

मुंबई : म्हाडाच्या विविध मंडळांमार्फत राज्यभरात उभारण्यात आलेल्या घरांकडे ग्राहकांनी पाठ फिरवली आहे. यामुळे हजारो घरे विक्रीविना पडून असल्याने म्हाडाचा तब्बल ३ हजार कोटींची निधी यामध्ये गुंतला आहे. यामुळे म्हाडाने नवीन इमारत प्रकल्पाचे काम सुरू करण्यापूर्वी ग्राहकांची मागणी जाणून घेण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी म्हाडाने स्वतंत्र सॉफ्टवेअर तयार केले आहे.

म्हाडाच्या विविध मंडळांमार्फत राज्यभरात अनेक प्रकल्प उभारण्यात आले आहेत. बाजारभावापेक्षा अधिक दराने जमीन घरेदी करून त्याठिकाणी प्रकल्प उभारले आहेत. तर काही ठिकाणी घरे विक्री होणार नाहीत, असा म्हाडा अधिकाऱ्यांनी शेरा मारल्यानंतरही त्याठिकाणी

प्रकल्प उभारण्यात आले आहेत. यामुळे म्हाडाच्या विविध मंडळांमार्फत उभारण्यात आलेली घरे विक्रीविना पडून आहेत. यामध्ये पुणे, नाशिक, कोकण मंडळ आघाडीवर आहेत. या मंडळांमार्फत उभारण्यात आलेली घरे विविध सवलती दिल्यानंतरही विक्री होत नसल्याने म्हाडासमोर पेच निर्माण झाला आहे. हजारो घरे धूळखात पडल्याने यामध्ये म्हाडाची तब्बल ३ हजार कोटींहून अधिक रक्कम अडकून पडली आहे.

कोकण मंडळामार्फत विरार बोळीज, खोणी, शिरढोण आदी ठिकाणी उभारलेली घरे अनेक वेळा लॉटरी काढण्यात आल्यानंतरही विक्रीस गेलेली नाहीत. तर पुणे मंडळाचे म्हाळुंगेसह विविध प्रकल्प विक्रीविना पडून आहेत. यामध्ये म्हाडाचे नुकसान होत असल्याने म्हाडाने अखेर ग्राहकांची मागणी असल्याशिवाय घरे उभारायची नाहीत, असा निर्णय घेतला आहे. यासाठी म्हाडाने ग्राहकांची मते जाणून घेण्यासाठी विशेष सॉफ्टवेअर तयार केले आहे. म्हाडाच्या विविध मंडळांना घरे उभारण्यासाठी दिलेल्या सर्व प्रकल्पांच्या मंजुऱ्या म्हाडा प्राधिकरणाने परतमागविल्या आहेत.

या शहरांमध्ये म्हाडाची घरे विक्रीविना पडून

पुणे मंडळाच्या हद्दीतील वाघैरे, ताथवडे, म्हाळुंगे, नाशिक मंडळाच्या हद्दीतील पाथरी, श्रीरामपूर

कोकण मंडळाच्या हद्दीतील विरार, खोणी, शिरढोण, वेंगुर्ला

समुद्रातील मासेमारीला लहान बोटी मुकणार; शासनाच्या निर्णयाला मच्छीमार कृती समितीचा विरोध

कामगारांच्या कामाचे तास वाढणार नाहीत; कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्याकडून स्पष्टीकरण

मुंबईत घुसले १४ दहशतवादी, ३४ वाहनांमध्ये मानवी बॉम्बस्फोट घडवणार; अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांना धमकी

Mumbai : लालबागच्या राजाचे अंतिम दर्शन घ्यायचे आहे? मग 'या' मार्गावर द्या बाप्पाला शेवटचा निरोप!

“शशी थरूर यांना स्पर्धक मिळाला”; पंजाबच्या महापुराबाबत पठ्ठ्याचं तोडकं-मोडकं इंग्रजी ऐकून नेटकरी लोटपोट, Video व्हायरल