MPSC पेपरफुटीप्रकरणी आणखी चौघांना अटक; आरोपींची संख्या ११ वर 
मुंबई

MPSC पेपरफुटीप्रकरणी आणखी चौघांना अटक; आरोपींची संख्या ११ वर

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) औषध निरीक्षक पदाच्या परीक्षेतील प्रश्नपत्रिका फुटीप्रकरणी तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) आणखी दोन उमेदवार आणि दोन मध्यस्थांना अटक केली आहे. या चार अटकांनंतर या प्रकरणातील अटक करण्यात आलेल्या आरोपींची संख्या ११ वर पोहोचली आहे.

प्रतिनिधी

पूनम अपराज/मुंबई

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) औषध निरीक्षक पदाच्या परीक्षेतील प्रश्नपत्रिका फुटीप्रकरणी तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) आणखी दोन उमेदवार आणि दोन मध्यस्थांना अटक केली आहे. या चार अटकांनंतर या प्रकरणातील अटक करण्यात आलेल्या आरोपींची संख्या ११ वर पोहोचली आहे.

अन्न व औषध प्रशासन विभागातील औषध निरीक्षक, गट-ब संवर्गातील १५४ पदांसाठी एमपीएससीने २२ मार्च २०२६ रोजी महाराष्ट्रातील सहा केंद्रांवर चाळणी परीक्षा घेतली होती.

तपासानुसार, एमपीएससी परीक्षेची गोपनीयता आणि निष्पक्षता धोक्यात आली होती. काही सरकारी अधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा कथित गैरवापर करून प्रश्नपत्रिकेच्या संचाच्या प्रती अनधिकृतपणे बाहेर पाठवल्या आणि आर्थिक फायद्यासाठी त्यांची देवाणघेवाण केल्याचा आरोप आहे.

पोलीस निरीक्षक मंगेश देसाई यांनी दिलेल्या तक्रारीवरून २५ ऑगस्ट २०२६ रोजी कफ परेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. भारतीय न्याय संहितेतील कलम ११२, ३१६(४), ३१६(५), ३१८(४), २३८(ब), ३१७(२), ३०३(२), ६१(२) आणि ३(५) तसेच महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा (गैरप्रकार प्रतिबंध) अधिनियम, २०२४ आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम, १९८८ मधील संबंधित तरतुदींनुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

तपासादरम्यान एसआयटीला कथितरीत्या असे आढळून आले की, एमपीएससीच्या गोपनीय विभागातील तज्ज्ञांनी निवडलेल्या प्रश्नपत्रिकेच्या संचाच्या प्रती तयार करण्यात आल्या. त्यानंतर या प्रती आयोगाच्या कार्यालयातून बेकायदेशीररीत्या बाहेर काढण्यात आल्या आणि आर्थिक फायद्यासाठी आरोपींपर्यंत पोहोचविण्यात आल्याचा तपास यंत्रणेचा दावा आहे.यापूर्वी एसआयटीने अवर सचिव अभिजित लेंढवे, गोपनीय विभागात कार्यरत असलेले सहायक कक्ष अधिकारी विश्वेश्वर नाकटे, सहायक कक्ष अधिकारी गोपाळ मराठे, कौटिल्य अकॅडमीचे संचालक प्रविण पाटील, मध्यस्थ अमृत पाटील आणि लोकेश ऊर्फ गौरव पाटील तसेच उमेदवार ऋतुजा पाटील यांना अटक केली होती.

पुढील तपासाचा भाग म्हणून एसआयटीने सांगली येथील उमेदवार साजिद सांडे आणि बुलढाणा येथील उमेदवार विजय किंगर यांना अटक केली. या दोघांनी बेकायदेशीर मार्गाने प्रश्नपत्रिकेचा संच मिळवल्याचा आरोप आहे.

याशिवाय या प्रकरणात मध्यस्थ म्हणून कथितरीत्या काम करणाऱ्या संदीप खलाटे आणि भैरवनाथ कदम यांनाही अटक करण्यात आली. दोघांना २४ सप्टेंबर रोजी नवी मुंबईतून अटक करण्यात आली. या चार अटकांमुळे एमपीएससी औषध निरीक्षक प्रश्नपत्रिका फुटीप्रकरणातील अटक आरोपींची संख्या आता ११ झाली आहे.

आतापर्यंतची कारवाई, एकूण अटक ११

यामध्ये एमपीएससीतील अधिकारी, खासगी अकॅडमीचे संचालक, मध्यस्थ आणि परीक्षार्थींचा समावेश असल्याचे तपासात समोर आले आहे. नवीन कारवाईत दोन उमेदवार आणि दोन मध्यस्थांना अटक करण्यात आली. २५ ऑगस्ट २०२६ रोजी कफ परेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. भारतीय न्याय संहिता, महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा (गैरप्रकार प्रतिबंध) अधिनियम, २०२४ आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमातील संबंधित तरतुदींनुसार कारवाई करण्यात आली आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Asian Games 2026 : कमलजित-सुरूचीचा सुवर्णवेध; १० मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक प्रकारात भारताचा विजय

जनमनातील शंका दूर कराव्या - चिराग पासवान

ज्ञानेश कुमारांचा पाय आणखी खोलात; सीईसींच्या निर्णयांना सुप्रीम कोर्टात आव्हान, २ ऑक्टोबरपासून देशव्यापी आंदोलन

मुख्य निवडणूक आयुक्तांनी २४ तासांत राजीनामा द्यावा - सीजेपी

आजचे राशिभविष्य, २६ सप्टेंबर २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत