मुंबई

मुंबईकर कन्येचा जागतिक विक्रम; १६ व्या वर्षी सात सर्वोच्च शिखरे सर

बारावीला असताना सर्वसामान्य मुले अभ्यास एके अभ्यास करतात. आपल्याला जास्तीत जास्त गुण कसे मिळतील, याकडे त्यांचे लक्ष असते. पण, मुंबईतील नौदल शाळेत शिकणाऱ्या काम्या कार्थिकेयन (१६) या विद्यार्थिनीने जगाच्या सात खंडातील सातही सर्वोच्च शिखरे सर करून जागतिक विक्रम घडवला आहे.

Swapnil S

मुंबई : बारावीला असताना सर्वसामान्य मुले अभ्यास एके अभ्यास करतात. आपल्याला जास्तीत जास्त गुण कसे मिळतील, याकडे त्यांचे लक्ष असते. पण, मुंबईतील नौदल शाळेत शिकणाऱ्या काम्या कार्थिकेयन (१६) या विद्यार्थिनीने जगाच्या सात खंडातील सातही सर्वोच्च शिखरे सर करून जागतिक विक्रम घडवला आहे. २४ डिसेंबरला काम्या कार्थिकेयन (१६) हिने अंटार्क्टिका खंडातील सर्वोच्च शिखर माऊंट व्हिन्सेटवर पाऊल ठेवून इतिहास घडवला आहे.

सर्वात तरुण गिर्यारोहक म्हणून तिने सात खंडातील सात सर्वोच्च शिखरे सर केली आहेत. यंदाच्या मे महिन्यात काम्याने माऊंट एव्हरेस्ट हे शिखर दक्षिण बाजूने सर केले होते. असा पराक्रम करणारी ती सर्वात तरुण भारतीय महिला व दक्षिण बाजूने शिखर सर करणारी दुसरी महिला ठरली.

आफ्रिकेतील माऊंट किलीमांजरो (ऑक्टोबर २०१७), युरोपातील माऊंट एल्बरस (जून २०१८), ऑस्ट्रेलियातील माऊंट कोस्युस्को (नोव्हेंबर २०१८), दक्षिण अमेरिकेतील माऊंट अकॉनग्वा (फेब्रुवारी २०२०), उत्तर अमेरिकेतील माऊंट डेनाली (फेब्रुवारी २०२२), नेपाळमधील माऊंट एव्हरेस्ट (मे २०२४) ही शिखरे तिने सर केली आहेत.

वयाच्या अवघ्या ७ व्या वर्षांपासून काम्याने गिर्यारोहणाला सुरुवात केली. तिने ट्रेक करून चंद्रशीला शिखर गाठले. त्यानंतर सातत्याने एकामागोमाग शिखरे ती सर करत गेली. दक्षिण अमेरिकेतील माऊंट अकॉनग्वा शिखरावर जाणारी सर्वात तरुण मुलगी, माऊंट डेनाली शिखरावर जाणारी सर्वात तरुण बिगर- अमेरिकन, माऊंट एल्ब्रसच्या शिखरावरून खाली स्की करणारी ती सर्वात तरुण व्यक्ती ठरली.

यंदा माऊंट एव्हरेस्ट सर केल्यानंतर काम्याने अंटार्क्टिकातील माऊंट व्हिन्सेट सर करण्याचा विडा उचलला होता. या मोहिमेसाठी तिने निधी संकलन केले. १८० जणांनी तिच्या मोहिमेला मदत केली. तिला देणगीतून ७ लाख रुपये मिळाले. तसेच कॉर्पोरेट कंपन्यांनी व गैरसरकारी संस्थांनी प्रायोजकत्व दिले.

नौदलाकडून अभिनंदन

काम्याच्या या जगविख्यात पराक्रमाबद्दल तिचे व तिच्या वडिलांचे शाळेने व नौदलाने अभिनंदन केले आहे. काम्या हिला 'पीएम राष्ट्रीय बालशक्ती' पुरस्कार मिळाला आहे. तसेच पंतप्रधान मोदींनी 'मन की बात'मध्ये तिचे कौतुक केले होते.

बोलणी फिस्कटली; आंदोलन सुरूच! मनोज जरांगे-शिंदे समिती यांच्यातील चर्चा निष्फळ, हैदराबाद गॅझेट लागू करण्यास सरकारची तत्त्वतः मंजुरी

मराठी अभिनेत्री प्रिया मराठेचे निधन; कर्करोगाशी झुंज ठरली अपयशी, वयाच्या ३८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

रेल्वे स्टेशनमध्ये दोन दिवस राहा फक्त दहा रुपयांत...आंदोलकांच्या व्हॉट्सअपवर मेसेज व्हायरल, वाशीतील एक्झिबिशन सेंटरमध्ये व्यवस्था

मराठा आंदोलकांनी केला चक्काजाम; जरांगे-पाटील यांच्या आवाहनानंतर रस्ता मोकळा

इशाऱ्यानंतर पालिका प्रशासनाचे नमते! फिरत्या शौचालयासह पुरवल्या इतर सुविधा; आंदोलकांसाठी पाण्याचे टँकर्सही अखेर उपलब्ध