अंकिता लोखंडे 
मुंबई

अंकिता लोखंडेसह २५ कलाकारांची दीड कोटींची फसवणूक; ५ जणांवर गुन्हा दाखल

सेलिब्रिटींच्या मॅनेजरने तक्रार दाखल केल्यानंतर चेंबूर पोलिसांनी ५ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

Swapnil S

मुंबई : अंकिता लोखंडे, आयुष शर्मासह २५ कलाकारांची १.५० कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी चेंबूर पोलिसांनी ५ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. सेलिब्रिटींच्या मॅनेजरने तक्रार दाखल केल्यानंतर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोशन बिंदर हे कार्यक्रम आणि जाहीरातीसाठी कलाकार देणारी कंपनी चालवतात. जुलै २०२४ मध्ये त्यांना एका व्यक्तीचा फोन आला. एनर्जी ड्रींकच्या जाहीरातीसाठी २५ कलाकारांची आवश्यकता असल्याचे त्याने सांगितले. आरोपीने १० लाख आगाऊ रकमेची पावती पाठवली. मात्र पैसे ट्रान्सफर केले नाही. त्यानंतर कलाकारांना दादर येथे पार्टीला येण्याचे आरोपीने बिंदरला सांगितले.

या कार्यक्रमाला अर्जुन बिजलानी, अभिषेक बजाज आणि हर्ष राजपूत यांच्यासह जवळपास १०० सेलिब्रिटी उपस्थित होते. यापैकी २५ जणांची जाहिरातीसाठी निवड करण्यात आली होती. आरोपींनी पेमेंट गॅरंटी म्हणून १५ लाख रुपयांच्या चेकचा फोटो पाठवला आणि आश्वासन दिले की ही रक्कम लवकरच बिंदर यांच्या खात्यात जमा होईल. बिंदरने जाहिरात शूट केली. त्यानंतरही पैसे मिळाले नाहीत. आपली फसवणूक झाल्याचे कळताच सेलिब्रिटींच्या मॅनेजरने तक्रार दाखल केली. त्यानंतर चेंबूर पोलिसांनी ५ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

महाराष्ट्र विधान परिषदेच्या १० जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान

सूर्य कोपतोय! राज्यात आज उष्णतेची तीव्र लाट; २३ जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’

महाराष्ट्रात जनावरांचे पहिले 'ब्युटी पार्लर'; लोकसहभागातून 'या' ग्रामपंचायतीचा नावीन्यपूर्ण उपक्रम

Mumbai : लोकलमधून पडून मृत्यू झालेल्या तरुणाच्या आईला ४ लाखांची भरपाई; उच्च न्यायालयाचा मध्य रेल्वेला दणका

Mumbai : ‘आराम’ हॉटेलचे अस्तित्व धोक्यात? रहेजाकडून कॅपिटल सिनेमाचे संपादन; जागा रिकामी करण्याच्या ऑफर