प्रतिकात्मक छायाचित्र
मुंबई

धक्कादायक! CSMT स्थानकाजवळ महिलेवर सामूहिक बलात्कार

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) स्थानकाजवळील पदपथावर दोघांनी आपल्यावर अत्याचार केल्याची तक्रार एका २९ वर्षीय महिलेने केली आहे.

Swapnil S

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) स्थानकाजवळील पदपथावर दोघांनी आपल्यावर अत्याचार केल्याची तक्रार एका २९ वर्षीय महिलेने केली आहे. याप्रकरणी माता रमाबाई आंबेडकर (एमआरए) मार्ग पोलिसांनी दोन अनोळखी व्यक्तीविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.

सीएसएमटी रेल्वे पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून तो एमआरए पोलिसांकडे वर्ग केला आहे. ही घटना २२ सप्टेंबर रोजी घडल्याची तक्रार पीडित महिलेने केली आहे. दोन आरोपीनी पीडित महिलेला उचलून बस आगाराच्या शेजारी असलेल्या टॅक्सी थांब्याजवळील पदपथावर नेले आणि तेथे तिचे तोंड दाबून तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. आरोपींनी २२ सप्टेंबरला मध्यरात्री पीडित महिलेवर आळीपाळीने अत्याचार केला. आरोपींनी महिलेचे तोंड दाबल्यामुळे तिला आरडाओरडा करता आला नाही, असे तिने तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी एमआरए मार्ग पोलीस परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील चित्रणाच्या मदतीने तपास करीत आहेत.

दरम्यान, पीडित महिला ही दादर येथील एका एनजीओमध्ये राहत होती. या महिलेची चौकशी करण्यासाठी पोलीस दादर येथे गेले असता सदर महिला तिथे नसल्याचे आढळून आले. पोलीस या महिलेसह आरोपींचाही शोध घेत आहेत.

फलटण : महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात मोठी अपडेट; आरोपी प्रशांत बनकर अटकेत, पोलिस उपनिरीक्षक अजूनही फरार

‘आपला दवाखाना’ योजनेचा बोजवारा; ठाण्यात ४० केंद्रे बंद, ६ महीने कर्मचाऱ्यांचा पगारही रखडला!

कलाविश्वावर शोककळा! विनोदी ज्येष्ठ अभिनेते सतीश शहा यांचे निधन

माथेरानमध्ये दिवाळीचा पर्यटन सीझन ठरला ‘फ्लॉप’; घाट मार्गावरील वाहतूक व्यवस्थापन ढिसाळ

७०६ झाडे तोडण्याचा निर्णय रद्द करावा; मुंबई उच्च न्यायालयात वकिलाची याचिकेद्वारे मागणी