एहतेशाम सिद्दीकीला सात वर्षांची शिक्षा 
मुंबई

Mumbai : एहतेशाम सिद्दीकीला सात वर्षांची शिक्षा

११ जुलै २००६ रोजी मुंबईच्या लोकलसेवेला हादरवून सोडणाऱ्या ७/११ बाॅम्बस्फोट प्रकरणात निर्दोष सुटलेल्या एहतेशाम सिद्दीकी याला सत्र न्यायालयाने मोठा दणका दिला आहे.

Swapnil S

मुंबई : ११ जुलै २००६ रोजी मुंबईच्या लोकलसेवेला हादरवून सोडणाऱ्या ७/११ बाॅम्बस्फोट प्रकरणात निर्दोष सुटलेल्या एहतेशाम सिद्दीकी याला सत्र न्यायालयाने मोठा दणका दिला आहे. प्रतिबंधित संघटना असलेल्या 'सिमी'शी संबंध असल्याच्या आरोपाखाली सिद्दीकीला माझगाव दंडाधिकारी न्यायालयाने सात वर्षांची शिक्षा सुनावली होती. ती शिक्षा सत्र न्यायालयाने कायम केली आहे. 

२१ ऑक्टोबर २०१६ रोजी माझगाव येथील अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकाऱ्यांनी सिद्दीकीला बेकायदेशीर कारवाया (प्रतिबंध) कायद्यांतर्गत खटल्यात सिमीचा सदस्य असल्याच्या आरोपावरून सिद्दीकीला दोषी ठरवले होते. त्याने देशाच्या सार्वभौमत्वाला धोका निर्माण करण्यासाठी 'सिमी' या प्रतिबंधित दहशतवादी संघटनेबद्दल पुस्तके प्रकाशित आणि वितरीत केल्याचा आरोप होता. दंडाधिकारी न्यायालयाने या प्रकरणात इतर चार जणांना निर्दोष सोडले होते

सिद्दीकी हा लोकल ट्रेनमधील ७/११ च्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात निर्दोष सुटला होता. मात्र प्रतिबंधित संघटना 'सिमी'चे सदस्यत्व स्वीकारणे आणि देशविरोधी साहित्य वितरित केल्याप्रकरणी दंडाधिकारी न्यायालयाने त्याला ७ वर्षांची शिक्षा ठोठावली होती. सिद्दीकीच्या घरातून 'जिहाद-फी-सबीलुल्ला' आणि 'इस्लाम की रूह' यांसारखी धार्मिक द्वेष पसरवणारी पुस्तके जप्त करण्यात आली होती. सत्र न्यायालयाच्या निर्णयानुसार, सिद्दीकीला ७ वर्षांची शिक्षा झाली असली, तरी तो पुन्हा तुरुंगात जाणार नाही. कारण या खटल्यादरम्यान त्याने आधीच ९ वर्षे कच्चा कैदी म्हणून तुरुंगात घालवली आहेत. 

Mumbai : कोस्टल रोडवर भरधाव BMW पुलावरून कोसळली; तिघांचा जागीच मृत्यू, अपघाताचा थरार CCTV मध्ये कैद

UPI व्यवहारांवरील शुल्क हा नागरिकांसाठी 'डिजिटल सापळा'; राज ठाकरेंचा केंद्र सरकारवर हल्ला

भारताचा GDP ३८ लाख कोटी डॉलरवर पोहोचेल; राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचा विश्वास

Mumbai : पूरमुक्तीसाठी महापालिकेचा ॲक्शन प्लॅन; १३ हजार कोटींचा खर्च अपेक्षित

Mumbai : शस्त्रक्रियेदरम्यान मज्जातंतूंचे नुकसान टाळण्यास मदत; पालिका रुग्णालयांत 'इंट्रा ऑपरेटिव्ह नर्व्ह मॉनिटरिंग' प्रणाली