मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प : विक्रोळीत ३५० टनी महाकाय कटरहेड भुयारात दाखल; मिठी नदीखाली खोदणार बोगदा (Photo - FPJ)
मुंबई

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प : विक्रोळीत ३५० टनी महाकाय कटरहेड भुयारात दाखल; मिठी नदीखाली खोदणार बोगदा

मुंबई-अहमदाबाद हाय-स्पीड रेल्वे (बुलेट ट्रेन) प्रकल्पाने आज एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा पार केला आहे.

Swapnil S

मुंबई : मुंबई-अहमदाबाद हाय-स्पीड रेल्वे (बुलेट ट्रेन) प्रकल्पाने आज एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा पार केला आहे. विक्रोळी येथे प्रकल्पासाठीच्या पहिल्या ‘टनेल बोअरिंग मशीन’चे (टीबीएम) तब्बल ३५० टन वजनाचे महाकाय ‘कटरहेड’ यशस्वीरित्या बोगद्यात उतरवण्यात आले. हे टीबीएम मशीन विक्रोळीहून खोदकामाला सुरुवात करून मिठी नदीखालून जात वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी) येथील निर्माणाधीन बुलेट ट्रेन स्थानकापर्यंत सुमारे ६ किलोमीटरचे अंतर कापणार आहे.

राज्यात बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या कामाला वेग आला आहे. या प्रकल्पातील २१ किमी लांबीचे बोगदा आणि देशातील पहिला समुद्राखालचा रेल्वे मार्ग तयार करण्यास सुरुवात झाली आहे. मुंबईतील एकूण २१ किलोमीटर लांबीच्या भुयारी मार्गापैकी १६ किलोमीटर भागाच्या खोदकामासाठी प्रत्येकी ३ हजार टनांहून अधिक वजनाचे दोन अवाढव्य टीबीएम वापरले जात आहेत. या २१ किमी अंतरामध्ये ठाणे खाडीखालून जाणाऱ्या ७ किलोमीटरच्या देशातील पहिल्या-वहिल्या समुद्राखालील रेल्वे बोगद्याचाही समावेश आहे. रेल्वे प्रकल्पांसाठी भारतात वापरण्यात येणारी ही आतापर्यंतची सर्वात मोठी टीबीएम मशिन्स आहेत.

सुरक्षेसाठी अत्याधुनिक उपकरणांची यंत्रणा

दाट लोकवस्तीच्या भागातून खोदकाम करताना आजूबाजूच्या इमारतींना आणि जमिनीला कोणताही धोका पोहोचू नये म्हणून अत्याधुनिक मॉनिटरिंग यंत्रणा तैनात करण्यात आली आहे. यामध्ये जमिनीची हालचाल मोजणारे 'सरफेस सेटलमेंट पॉईंट्स', इमारतींचा कल मोजणारे 'टिल्ट मीटर्स', लेझरच्या सहाय्याने बारीक बदल टिपणारे 'थ्री-डी टार्गेट्स', बोगद्याच्या भिंतींवरील ताण मोजणारे 'स्ट्रेन गेज' आणि खोदकामाच्या कंपनांवर लक्ष ठेवणारे 'सिस्मोग्राफ' यांसारख्या हाय-टेक उपकरणांचा वापर करण्यात येत आहे.

१. या प्रकल्पात एकाच बोगद्यात दोन्ही ट्रॅक असणार आहेत. १३.६ मीटर व्यासाचे टीबीएम मशीनचे कटरहेड एकाच बोगद्यातून बुलेट ट्रेनच्या येणाऱ्या आणि जाणाऱ्या दोन्ही लाईन्स जातील एवढा मोठा बोगदा खोदण्यास सक्षम आहे.

२. ३५० टन वजनाचे हे कटरहेड म्हणजे सुमारे २५० मध्यम आकाराच्या एसयूव्ही कारच्या वजनाइतके आहे.

३. हे कटरहेड पाच वेगवेगळ्या भागांतून आणून १६०० किलोच्या अति-अचूक वेल्डिंगद्वारे जागेवरच जोडण्यात आले.

४. हे मशीन कडक खडक कापण्यासाठी यावर ८४ कटर डिस्क, १२४ स्क्रॅपर्स आणि १६ बकेट लिप्स बसवण्यात आले आहेत.

Maharashtra Weather : पावसाचा तडाखा वाढणार; "समुद्रकिनारे, धबधब्यांपासून दूर राहा," मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे नागरिकांना आवाहन

Mumbai Rain : मुसळधार पावसाचा धोका वाढला; खासगी कंपन्यांसाठी 'वर्क फ्रॉम होम'च्या सूचना, सरकारी कर्मचाऱ्यांना हाफ डे

Mumbai Rain : मुंबईच्या डबेवाल्यांनाही मुसळधार पावसाचा फटका; आज सेवा बंद

मुंबई-पुणे एक्सप्रेसवे वाहतुकीसाठी खुला; रेल्वे मार्गावरील काम सुरू, नागरिकांना अनावश्यक प्रवास टाळण्याचे आवाहन

Mumbai Rain : मुंबईसाठी रेड अलर्ट! ताशी ९० किमी वेगाने वादळी वारे; अतिवृष्टीचा इशारा, १५ हजार कर्मचारी तैनात