मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प : साबरमती नदीवरील पुलाचे काम पूर्ण; गुजरातमधील २१ नदी पुलांपैकी १८ पुलांची बांधणी पूर्ण  ANI
मुंबई

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प : साबरमती नदीवरील पुलाचे काम पूर्ण; गुजरातमधील २१ नदी पुलांपैकी १८ पुलांची बांधणी पूर्ण

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पातील अहमदाबाद येथील साबरमती नदीवरील ४८० मीटर लांबीच्या पुलाचे बांधकाम पूर्ण झाले आहे. सुमारे ३६ मीटर उंच असलेला हा पूल १२ मजली इमारतीइतका असून, अहमदाबादमधील बुलेट ट्रेन मार्गावरील संरचनात्मक कामांपैकी एक आहे.

Swapnil S

मुंबई : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पातील अहमदाबाद येथील साबरमती नदीवरील ४८० मीटर लांबीच्या पुलाचे बांधकाम पूर्ण झाले आहे. सुमारे ३६ मीटर उंच असलेला हा पूल १२ मजली इमारतीइतका असून, अहमदाबादमधील बुलेट ट्रेन मार्गावरील संरचनात्मक कामांपैकी एक आहे. या पुलामुळे मार्गावरील विद्यमान रेल्वेमार्ग आणि अन्य पायाभूत सुविधांशी आवश्यक अंतर राखून ट्रेनचा मार्ग विकसित करण्यास मदत होणार आहे.

साबरमती आणि अहमदाबाद या बुलेट ट्रेन स्थानकांदरम्यान हा पूल आहे. साबरमती स्थानकापासून तो सुमारे एक किलोमीटर, तर अहमदाबाद स्थानकापासून चार किलोमीटर अंतरावर आहे. अहमदाबाद-दिल्ली मुख्य रेल्वेमार्गाजवळ हा पूल असून हा रेल्वेमार्ग जमिनीपासून १४.८ मीटर उंचीवर आहे. हा अतिजलद रेल्वे मार्ग अहमदाबादमध्ये उड्डाणपूल, रेल्वेमार्ग आणि मेट्रो मार्गिकांसह पायाभूत सुविधांना ओलांडतो. त्यामुळे उभे अंतर राखण्यासाठी नदीवरील पुलाच्या खांबांची उंची अधिक ठेवण्यात आली आहे.

प्रत्येक स्पॅनमध्ये २३ काँक्रीट विभागांचा समावेश

बुलेट ट्रेन मार्गावरील बहुतांश नदी पुलांमध्ये सुमारे ४० मीटरचे स्पॅन आहेत. मात्र, साबरमती पुलामध्ये ५० ते ७६ मीटर लांबीचे स्पॅन तयार करण्यात आले आहेत. यात ७६ मीटरचे पाच आणि ५० मीटरचे दोन स्पॅन आहेत. प्रत्येक स्पॅनमध्ये २३ काँक्रीट विभागांचा समावेश असून त्यांचे बांधकाम प्रत्यक्ष जागेवर करण्यात आले.

खांबांची रचना अडथळा कमी करणारी

या पुलासाठी सहा ते साडेसहा मीटर व्यासाचे आठ गोलाकार खांब उभारण्यात आले आहेत. त्यापैकी चार नदीपात्रात, दोन नदीच्या दोन्ही काठांवर प्रत्येकी एक आणि उर्वरित दोन खांब नदीकाठाबाहेर आहेत. खांबांची ही रचना नदीच्या पाण्याच्या प्रवाहातील अडथळे कमीत कमी ठेवण्याच्या दृष्टीने करण्यात आली आहे.

'बॅलन्स्ड कँटिलिव्हर' तंत्रज्ञानाचा वापर

पुलासाठी 'बॅलन्स्ड कॅटिलिव्हर' तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. या पद्धतीत पुलाच्या खांबांपासून दोन्ही बाजूंना संतुलित पद्धतीने बांधकाम केले जाते. त्यामुळे नदीपात्रात आधाररचना उभारण्याची गरज कमी होते. विभागांना पोस्ट-टेन्शनिंगद्वारे जोडून पुलाचा सलग डेक तयार केला जातो. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्गावर एकूण २५ नदी पूल असून, त्यापैकी २१ गुजरातमध्ये आणि चार महाराष्ट्रात आहेत.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

वेळेआधीच मान्सूनची माघार; मुंबईसह महाराष्ट्रातून परतीचा प्रवास सुरू, हवामान खात्याची घोषणा

Mumbai : ठाकरे बंधूंचा आज गर्जना मोर्चा

'मविआ'त नाराजीनाट्य; काँग्रेसने विधान परिषद उमेदवारी जाहीर केल्याने आघाडीत बिघाडी; नेत्यांमध्ये आज पुन्हा चर्चा

शिवाजी पार्कवर विनापरवानगी आंदोलन; ५०० जणांवर गुन्हे, दीपकेंसह आयोजकांचा समावेश

जंतरमंतरवर १५० आंदोलक ताब्यात; नेहा बोरा, योगेंद्र यादव, प्रशांत भूषण यांचा समावेश