मेघा कुचिक-अवधूत खराडे/मुंबई
चार मुंबईत प्राण्यांवरील क्रूरतेच्या दोन वेगवेगळ्या घटना समोर आल्या आहेत. मालाडमध्ये महिन्यांच्या मांजरावर विष प्रयोग करून तिची हत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे, तर मुलुंडमध्ये एका भरधाव कारने भटक्या कुत्रीला चिरडल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. या दोन्ही प्रकरणी मुंबई पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हे दाखल करून तपास सुरू केला आहे.
मालाड पहिल्या घटनेत पश्चिमेकडील मिठ चौकी भागातील एका गृहनिर्माण संस्थेत ही धक्कादायक घटना घडली. येथे एक चार महिन्यांची पांढऱ्या आणि लाल रंगाची मांजरी नियमितपणे फिरत असे आणि परिसरातील रहिवासी तिला खायला देत असत. १४ ऑगस्ट रोजी दुपारी २ च्या सुमाराला या मांजरीला उलट्या होऊन ती बेशुद्ध पडल्याचे सुरक्षारक्षकाने महिला रहिवाशाच्या निदर्शनास आणून दिले. या महिलेने सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, मांजर फिरत असताना अचानक उलट्या होऊन कोसळल्याचे दिसले. या प्रकरणी बांगुरनगर पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मुन्नी श्वानाचा मृत्यू
मुलुंड पश्चिमेतील 'निर्मल लाइफस्टाईल सोसायटी'मध्ये १८ ऑगस्टला दुपारी ही घटना घडली. 'मुन्नी' नावाच्या एका भटक्या कुत्रीला अज्ञात कारचालकाने अतिशय वेगाने आणि निष्काळजीपणे चालवून चिरडले. या अपघातात गंभीर जखमी होऊन मुन्नीचा जागीच मृत्यू झाला, तर कारचालक जखमी प्राण्याला मदत न करता घटनास्थळावरून पसार झाला. प्राणिमित्र ऋतिका मौर्य यांनी तात्काळ पोलीस हेल्पलाइनवर संपर्क साधला.