Mumbai : कर्मचाऱ्यांच्या ग्रॅच्युईटीसाठी बेस्टची पुन्हा पालिकेला साद 'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
मुंबई

Mumbai : कर्मचाऱ्यांच्या ग्रॅच्युईटीसाठी बेस्टची पुन्हा पालिकेला साद

सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची देणी देण्यासाठी बेस्ट उपक्रमाकडे पैशांची चणचण आहे.

Swapnil S

मुंबई : सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची देणी देण्यासाठी बेस्ट उपक्रमाकडे पैशांची चणचण आहे. त्यामुळे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची देणी देणे, नवीन बसेस खरेदी आदी कामांसाठी निधी मिळावा, यासाठी बेस्ट उपक्रमाकडून पालिकेला पुन्हा एकदा मदतीसाठी पत्रव्यवहार करण्यात येणार आहे. याबाबतचा निर्णय सोमवारच्या बेस्ट समितीच्या बैठकीत घेण्यात आला.

दरम्यान, यापूर्वीही बेस्ट समिती अध्यक्षा व महाव्यवस्थापक यांनी पालिका प्रशासनाकडे प्रस्ताव सादर केला होता. मात्र त्यावेळी सकारात्मक भूमिका न घेतल्याने सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची देणी रखडली आहेत. बेस्ट उपक्रमाच्या सन २०२६-२७ च्या अर्थसंकल्पीय अंदाजामध्ये सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या थकीत उपदान (ग्रॅच्युईटी) व अंतिम देयकाची रक्कम १५०२ कोटी व परिवहन विभागाची बस संचलनासाठी येणारी तूट २४३९ कोटी अशी एकूण ३ हजार ९४१ कोटीची मागणी बेस्टने मुंबई महानगरपालिकेकडे केली होती. बेस्ट उपक्रमाचे वित्तीय कामकाज सुरळीतपणे चालवण्याकरिता ३ हजार ९४१ कोटी अनुदानाची तातडीने मागणी केली होती. मात्र महापालिकेने बेस्ट उपक्रमाचा हा प्रस्ताव फेटाळत निधी उभारण्याबाबत काही सूचना केल्या होत्या. या सूचनांची अमलबजावणी प्रशासनाने केली आहे. यानंतरही बेस्टला निधी मिळविण्यात यश आलेले नाही.

प्रश्न मार्गी लागण्यासाठी प्रयत्न आवश्यक

मंजुरीसाठी मांडण्यात आलेल्या या प्रस्तावावर सदस्य सुनील गणाचार्य यांनी पालिका निधी देत नसल्याने पुन्हा प्रस्ताव पाठवणे उचित होणार नसल्याचे अध्यक्ष आणि प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले. यासाठी सर्वांनी मिळून हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करण्याची सूचना त्यांनी केली.

Mumbai : ठाकरे बंधूंची आज दादरमध्ये विजयी सभा; तरुणांनी भीती घालवली - उद्धव ठाकरे

Mumbai : जन्म दाखल्यासाठी सॉफ्टवेअर आणणार; मानखुर्द, कुर्ल्यातील दाखल्यांचा तत्काळ निपटारा करा, अतिरिक्त आयुक्तांचे निर्देश

फडणवीस अचानक दिल्लीला, चर्चांना उधाण; भेटीगाठींबाबत गुप्तता, काही तासांनंतर नागपुरात परत

महाराष्ट्र टीईटी पेपरफुटी प्रकरण : TET पेपरफुटीचा सूत्रधार अटकेत

Shahapur : भातसा वाहू लागले; मुंबईकरांची चिंता मिटली