Mumbai : बेस्ट कर्मचाऱ्यांना मिळणार वेतनवाढ; पदवी, पदव्युत्तर पदवीधारकांना लाभ, बेस्ट समिती अध्यक्षांचे महाव्यवस्थापकांना पत्र  'एआय' ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
मुंबई

Mumbai : बेस्ट कर्मचाऱ्यांना मिळणार वेतनवाढ; पदवी, पदव्युत्तर पदवीधारकांना लाभ, बेस्ट समिती अध्यक्षांचे महाव्यवस्थापकांना पत्र

बेस्ट उपक्रमातील पदवी/पदव्युत्तर पदवी तसेच अतिरिक्त शैक्षणिक पात्रता प्राप्त केलेल्या कर्मचाऱ्यांना अतिरिक्त वेतनवाढीचा लाभ मिळण्याची शक्यता आहे.‌

Swapnil S

मुंबई : बेस्ट उपक्रमातील पदवी/पदव्युत्तर पदवी तसेच अतिरिक्त शैक्षणिक पात्रता प्राप्त केलेल्या कर्मचाऱ्यांना अतिरिक्त वेतनवाढीचा लाभ मिळण्याची शक्यता आहे.‌ सन २०२४ पासून बंद करण्यात आलेली अतिरिक्त वेतनवाढ पुन्हा सुरू करण्यासाठी बेस्ट समिती अध्यक्ष तृष्णा विश्वासराव यांनी याबाबत प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. बेस्ट उपक्रमाच्या महाव्यवस्थापक सोनिया सेठी यांना याविषयी तृष्णा विश्वासराव यांनी पत्र लिहिले आहे.

बेस्ट उपक्रमातील अनेक कर्मचारी आपल्या नोकरीसोबतच पुढील शिक्षण घेऊन पदवी/पदव्युत्तर पदवी तसेच अतिरिक्त शैक्षणिक पात्रता प्राप्त करीत आहेत.

अशा कर्मचाऱ्यांनी आपल्या कर्तव्याबरोबरच शैक्षणिक प्रगती साधून उपक्रमाच्या एकूण कार्यक्षमतेत व गुणवत्तेत मोलाची भर घातली आहे. तरी अशा पदवी/पदव्युत्तर पदवी तसेच अतिरिक्त शैक्षणिक पात्रताप्राप्त कर्मचाऱ्यांचा उत्साह वाढविण्यासाठी व इतर कर्मचाऱ्यांनादेखील उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे यासाठी त्यांना मिळणारी अतिरिक्त वेतनवाढ पुन्हा तातडीने सुरू करण्यात यावी, असे पत्र सोनिया सेठी यांना लिहिल्याचे तृष्णा विश्वासराव यांनी सांगितले.

Mumbai : उद्या मध्य आणि हार्बर रेल्वेवर मेगाब्लॉक; पश्चिम रेल्वेवर मध्यरात्री जम्बो ब्लॉक, कोणत्या लोकल रद्द? जाणून घ्या

Mumbai CJP Protest : अभिनेता इम्रान खान पोलिसांच्या ताब्यात; व्हॅनमधून फोटो शेअर करत म्हणाला...

CJP Protest : आंदोलनाला हिंसक वळण; अरविंद केजरीवाल, ममता बॅनर्जींसह अनेक नेते पोलिसांच्या ताब्यात, Video

CJP Protest : अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; जंतर-मंतरवरील आंदोलनाची धुरा आता अजिंक्य शिंदेंकडे, Video

अभिजीत दिपके यांच्या आजीचं निधन; नातू दिल्लीत पोलिसांच्या ताब्यात, अंत्यसंस्कारासाठी गावी परतण्याची शक्यता