Mumbai : भाजप-शिंदे सेनेतील वाद मावळला; पम्पिंग स्टेशनची दोन्ही पक्षांकडून आज संयुक्त पाहणी 
मुंबई

Mumbai : भाजप-शिंदे सेनेतील वाद मावळला; पम्पिंग स्टेशनची दोन्ही पक्षांकडून आज संयुक्त पाहणी

नालेसफाईच्या पाहणी दौऱ्यात उपमहापौर संजय घाडी यांसह शिंदेंच्या शिवसेनेला डावलल्याचा आरोप घाडी यांनी केला होता.

Swapnil S

मुंबई : नालेसफाईच्या पाहणी दौऱ्यात उपमहापौर संजय घाडी यांसह शिंदेंच्या शिवसेनेला डावलल्याचा आरोप घाडी यांनी केला होता. पाहणी दौऱ्यावरून भाजप-शिवसेनेतील वाद चिघळत असताना, आता पम्पिंग स्टेशनच्या संयुक्त पाहणी दौऱ्यामुळे वादावर पडदा पडला आहे.

मंगळवारी भाजपचे नेते आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते एकत्र वरळी लव्ह ग्रो तसेच रे रोड येथील ब्रिटानिया पम्पिंग स्टेशनची पाहणी करणार आहेत. यासाठी बेस्ट उपक्रमाच्या दोन एसी बसेस बुक करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे, भाजप व शिंदे सेनेत समन्वय राखण्याची जबाबदारी पालिकेतील गटनेते अमय घोले यांच्यावर सोपवण्यात आली आहे.

वरिष्ठांकडून कानउघाडणी

मुंबई महापालिकेतील भाजप व शिंदे सेनेतील दुरावा याची दखल वरिष्ठ पातळीवर घेण्यात आल्याचे समजते. पालिकेत भाजप व शिंदे सेनेने एकत्र काम करावे, अशी कानउघाडणी वरिष्ठ पातळीवरून करण्यात आल्याचे समजते. मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम, शिंदे सेनेचे माजी खासदार राहुल शेवाळे यांच्या उपस्थितीत पम्पिंग स्टेशनचा पाहणी दौरा आयोजित करण्यात आला आहे.‌ तसेच मुंबई महापालिकेतील भाजप व शिंदे सेनेचे पदाधिकारी या दौऱ्यात उपस्थित असणार आहेत.

PF क्लेम रिजेक्ट होऊ नये म्हणून आत्ताच करा 'हे' काम; EPFO चा सल्ला

डाबरच्या 'या' उत्पादनांवर FSSAI ची बंदी; ग्राहकांची दिशाभूल केल्याचा आरोप

'हवेतच २-३ मिनिटं विमान हेलकावलं'; थायलंडहून येणाऱ्या एअर इंडिया फ्लाइटमध्ये प्रवाशांचा थरकाप, Video

Pune : कौटुंबिक वादातून संतापजनक कृत्य! ९ महिन्यांच्या बाळाच्या तोंडात टाकलं फेव्ही क्विक

मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार? Jio, Airtel आणि Vi ग्राहकांसाठी मोठी अपडेट