प्रातिनिधिक छायाचित्र  
मुंबई

Mumbai : पावसाच्या पाण्यातून चालल्यास लेप्टोची लागण; प्रतिबंधात्मक औषधोपचार ७२ तासांत करण्याचे BMC चे आवाहन

मुंबईत सलग पडणाऱ्या पावसामुळे काही ठिकाणी संथ गतीने पाण्याचा निचरा होत आहे. त्यामुळे ज्या व्यक्तीच्या शरीरावरील जखम किंवा खरचटलेल्या भागाचा साचलेल्या पाण्याशी किंवा चिखलाशी संपर्क आला आहे. अशा व्यक्तींना लेप्टोचा संसर्ग होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे अशा व्यक्तींनी ७२ तासांच्या आत प्रतिबंधात्मक औषधोपचार करावे, असे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले.

Swapnil S

मुंबई : मुंबईत सलग पडणाऱ्या पावसामुळे काही ठिकाणी संथ गतीने पाण्याचा निचरा होत आहे. त्यामुळे ज्या व्यक्तीच्या शरीरावरील जखम किंवा खरचटलेल्या भागाचा साचलेल्या पाण्याशी किंवा चिखलाशी संपर्क आला आहे. अशा व्यक्तींना लेप्टोचा संसर्ग होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे अशा व्यक्तींनी ७२ तासांच्या आत प्रतिबंधात्मक औषधोपचार करावे, असे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले.

अतिवृष्टीदरम्यान पावसाच्या साचलेल्या किंवा वाहत्या पाण्यातून नागरिकांना चालावे लागते. याच पाण्यात ‘लेप्टोस्पायरोसिस’ या रोगाचे ‘लेप्टोस्पायरा’ हे सूक्ष्म जंतू असू शकतात. अशा बाधित पाण्याशी माणसाचा संपर्क आल्यास त्याला लेप्टोची बाधा होण्याची शक्यता असते. तर लेप्टोस्पायरोसिस हा एक गंभीर आजार असून वेळीच औषधोपचार न केल्यास तो प्राणघातक ठरू शकतो, असे म्हटले आहे.

महाराष्ट्र विधान परिषदेच्या १० जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान

बारामती पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवारांचाच विजय! युगेंद्र पवारांचा २ लाखांहून अधिक मताधिक्याचा दावा

सूर्य कोपतोय! राज्यात आज उष्णतेची तीव्र लाट; २३ जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’

Mumbai : एशियाटिक निवडणुकीचा मार्ग मोकळा; निवडणुकीच्या प्रस्तावित प्रक्रियेचा कालबद्ध आराखडा सादर करण्याचे निर्देश

लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी अमीर हमजावर अज्ञात हल्लेखोरांकडून गोळीबार; लाहोरमधील जीवघेण्या हल्ल्यात गंभीर जखमी