पदपथांवरील 'आरे' स्टॉलवरही हातोडा; 'पादचारी प्रथम' अभियानांतर्गत BMC करणार कारवाई; मुंबईतील १६०३ स्टॉलधारकांवर टांगती तलवार  'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
मुंबई

पदपथांवरील 'आरे' स्टॉलवरही हातोडा; 'पादचारी प्रथम' अभियानांतर्गत BMC करणार कारवाई; मुंबईतील १६०३ स्टॉलधारकांवर टांगती तलवार

पदपथ हे पादचाऱ्यांना चालण्यासाठी असून अतिक्रमणमुक्त फुटपाथ असावेत यासाठी मुंबई महापालिका आता पदपथावर अडथळा ठरणाऱ्या आरेच्या स्टॉलवरही कारवाई करणार आहे. दरम्यान, आरेच्या स्टॉलवर कारवाई करत असताना पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी आरे डेअरी प्रशासनाने पालिका प्रशासनाकडे केली आहे.

Swapnil S

मुंबई : पदपथ हे पादचाऱ्यांना चालण्यासाठी असून अतिक्रमणमुक्त फुटपाथ असावेत यासाठी मुंबई महापालिका आता पदपथावर अडथळा ठरणाऱ्या आरेच्या स्टॉलवरही कारवाई करणार आहे. दरम्यान, आरेच्या स्टॉलवर कारवाई करत असताना पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी आरे डेअरी प्रशासनाने पालिका प्रशासनाकडे केली आहे.

शहरातील पदपथ अतिक्रमणमुक्त करून पादचाऱ्यांना सुरक्षित आणि सुलभमार्ग उपलब्ध करून देण्यासाठी मुंबई महापालिकेने 'पादचारी प्रथम' अभियान हाती घेतले आहे. या अभियानांतर्गत पदपथांवर उभारण्यात आलेले 'आरे डेअरी' आणि 'सरिता स्टॉल' यांची तपासणी करण्यात येणार असून पादचाऱ्यांच्या मार्गात अडथळा ठरणारे स्टॉल हटविण्यात किंवा अन्यत्र स्थलांतरित करण्यात येणार आहेत.

महापालिकेने सुरू केलेल्या 'पादचारी प्रथम' अभियानाचा मुख्य उद्देश पदपथ हे केवळ पादचाऱ्यांसाठी उपलब्ध करून देणे हा आहे. त्यानुसार संबंधित विभागांकडून प्रत्येक स्टॉलचे प्रत्यक्ष पाहणीद्वारे सर्वेक्षण केले जाणार आहे. पदपथाची रुंदी, पादचाऱ्यांची वर्दळ, वाहतूक परिस्थिती आणि सार्वजनिक सुरक्षेच्या निकषांवर स्टॉलचे मूल्यांकन करण्यात येणार आहे.

'आरे डेअरी' - संबंधित संस्थांशी साधणार समन्वय

स्टॉलमुळे पादचाऱ्यांना ज्या ठिकाणी अडथळा निर्माण होत असल्याचे आढळेल, त्या ठिकाणी संबंधित स्टॉल हटविणे किंवा योग्य पर्यायी जागेवर स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. यासाठी 'आरे डेअरी' आणि संबंधित संस्थांशी समन्वय साधून पुढील कार्यवाही केली जाणार असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

पदपथांवरून चालण्यात अडथळा

मुंबई शहर आणि दोन्ही उपनगरांमध्ये 'आरे' व 'सरिता'चे मिळून एकूण १,६०३ स्टॉल आहेत. त्यापैकी अनेक स्टॉल हे पदपथांवर किंवा पादचाऱ्यांच्या मार्गालगत उभारण्यात आले आहेत. त्यामुळे काही ठिकाणी नागरिकांना पदपथांवरून चालण्यात अडथळा येत असल्याची बाब पालिका प्रशासनाच्या निदर्शनास आली आहे.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : गणपती आगमन मिरवणुकीला गालबोट! भुलेश्वरच्या राजाची मूर्ती कोसळून २ ठार, ५ जखमी; VIDEO

JNPT येथून पहिली 'डबल-स्टॅक लाँग-हॉल' कंटेनर ट्रेन धावली; ३६० टीईयू माल घेऊन ४२२ किमीचा प्रवास वेळ वाचणार; पोर्टवरील गर्दी कमी होणार

Mumbai : महापौर बंगल्यात काय बदल केला? ठाकरे सेना, काँग्रेस करणार पाहणी

आता कांदाही रडवणार; कांदा दरातील तेजी दोन महिने कायम राहण्याचा अंदाज

Mumbai : महापालिका शाळांच्या विद्यार्थ्यांची केशव सृष्टीतील शैक्षणिक सहल वादात