Mumbai : पालिकेच्या ७१९ आशा स्वयंसेविकांनाही भाऊबीज; प्रत्येकी पाच हजार रुपये भेट 
मुंबई

Mumbai : पालिकेच्या ७१९ आशा स्वयंसेविकांनाही भाऊबीज; प्रत्येकी पाच हजार रुपये भेट

दीपावली २०२६ निमित्त मुंबई महापालिकेतील आशा स्वयंसेविकांबाबत महापौर रितू तावडे यांनी महत्त्वपूर्ण आणि संवेदनशील निर्णय घेतला आहे.

Swapnil S

मुंबई : दीपावली २०२६ निमित्त मुंबई महापालिकेतील आशा स्वयंसेविकांबाबत महापौर रितू तावडे यांनी महत्त्वपूर्ण आणि संवेदनशील निर्णय घेतला आहे. महानगरपालिकेच्या अखत्यारीतील १,४६१ आशा स्वयंसेविकांना पहिल्यांदाच प्रत्येकी ५,००० रुपये भाऊबीज भेट जाहीर केल्यानंतर, आता राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत महापालिकेसाठी कार्यरत असलेल्या ७१९ आशा स्वयंसेविकांचाही यामध्ये समावेश करण्यात आला आहे. यामुळे मुंबईत आरोग्य सेवेत कार्यरत असलेल्या एकूण २,१८० आशा स्वयंसेविकांना प्रथमच ५,००० रुपयांचे दीपावली सानुग्रह अनुदान मिळणार आहे.

पालिकेच्या १,४६१ आशा सेविकांना भाऊबीज भेट जाहीर झाली होती. याच धर्तीवर राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानातील आशा सेविकांसाठी महापौरांनी हा निर्णय घेतला.

पालिकेने घेतली दखल

महानगरपालिकेचे नियमित अधिकारी व कर्मचाऱ्यांप्रमाणेच जनसामान्यांशी थेट जोडल्या गेलेल्या इतर सर्व घटकांच्या कामाचीही महापालिकेने यथोचित दखल घेतली आहे. या निर्णयानुसार महापालिकेतील २,३९३ सामाजिक आरोग्य स्वयंसेविकांना (सीएचव्ही) प्रत्येकी १४,००० रुपये, तर २,३६० बालवाडी शिक्षिका आणि मदतनिसांना प्रत्येकी ७,००० रुपयांची भाऊबीज भेट दिली जाणार आहे.

(संबधित इंग्रजी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

'मुरासू' चक्रीवादळाचा धोका वाढला; चेन्नईत शाळा-कॉलेजला सुट्टी; आंध्रला रेड अलर्ट, महाराष्ट्रातही पावसाचा इशारा

Thane : येऊरमध्ये ‘हॅलोविन पार्टी’वर पोलिसांची धाड; ७० हून अधिक तरुण-तरुणी उपस्थित, मद्यपान आणि प्रतिबंधित ई-सिगारेटचा वापर

LPG Price Hike : दिवाळीच्या तोंडावर व्यावसायिक गॅस सिलिंडर महागला; घरगुती एलपीजी सिलिंडरचे दर स्थिर

कर्जतमध्ये १०० एकरावर ‘अनंत आश्रय’; अनाथ, दिव्यांग आणि ज्येष्ठांसाठी वसाहत; पाच हजारांसाठी आयुष्यभराचा निवारा

Mumbai : काजू-अंजीर कतली, बर्फीनेही खाल्ला भाव; खरेदीसाठी आधीच बुकींग