Mumbai : अतिक्रमणांवर बुलडोझर; मुलुंड, मोहम्मद अली रोडवर पालिकेची धडक  
मुंबई

Mumbai : अतिक्रमणांवर बुलडोझर; मुलुंड, मोहम्मद अली रोडवर पालिकेची धडक

फुटपाथ पादचाऱ्यांना चालण्यासाठी असून अतिक्रमणमुक्त फुटपाथ, यासाठी 'पादचारी प्रथम' अभियान राबविण्यात येत आहे.

Swapnil S

मुंबई : फुटपाथ पादचाऱ्यांना चालण्यासाठी असून अतिक्रमणमुक्त फुटपाथ, यासाठी 'पादचारी प्रथम' अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत गुरुवारी मुलुंड पूर्व येथील पुरुषोत्तम खेराज मार्ग व मोहम्मद अली रोडवरील फुटपाथवरील बेकायदा बांधकामे, दुकानांच्या बाहेरील बेकायदा शेड हटवण्यात आले.

टी विभागामार्फत मुलुंड (पूर्व) येथील पुरुषोत्तम खेराज मार्ग परिसरात विशेष अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबविण्यात आली. या कारवाईमुळे पदपथ आणि रस्त्यांवरील अडथळे दूर करण्यात आले असून पादचाऱ्यांच्या मुक्त हालचालीसाठी मार्ग मोकळा करण्यात आला. पादचारी प्रथम अभियानांतर्गत राबविण्यात आलेल्या या मोहिमेत अनधिकृत अतिक्रमणांवर कारवाई करण्यात आल्याचे टी वॉर्डच्या सहायक आयुक्त योगिता कोल्हे यांनी सांगितले.

देखभाल विभाग, घनकचरा विभागही सहभागी

दरम्यान, बी विभागात सहाय्यक आयुक्त जितेंद्र घोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली मोहम्मद अली रोड येथेही अतिक्रमण हटाव मोहीम पार पडली. या कारवाईत देखभाल विभाग, घनकचरा व्यवस्थापन विभाग तसेच परवाना व अतिक्रमण विभागाचे अधिकारी सहभागी झाले होते. या कारवाईदरम्यान दोन अनधिकृत दुकाने, स्टॉल, चार सिमेंट ओटे, दोन अन्य बेकायदा बांधकामे तसेच दुकानांचे वाढीव भाग, ताडपत्री शेड आणि विविध अनधिकृत साहित्य हटविण्यात आले. यामुळे परिसरातील पदपथ आणि रस्ते अतिक्रमणमुक्त करून पादचाऱ्यांना सुरक्षित व सुलभ मार्ग उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

२०२९ पर्यंत राज्यातच! दिल्लीला जाण्याच्या चर्चांना फडणवीसांचा पूर्णविराम; माझे नेते, पक्ष ठरवेल त्या दिवशी मात्र मी जरूर दिल्लीला जाईन...

Mumbai : बिल्डर, आर्किटेक्टवर पालिकेची होणार कारवाई; हवा प्रदूषणाबाबतचे नियम अधिक कडक

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा सूर मंदावला; पीओपी मूर्ती, रासायनिक रंग आणि खर्चाचा परिणाम, उत्सवाला ग्रहण झगमगाटाचे

Mumbai : आरोपपत्र दाखल केल्यानंतर दीर्घकाळ कोठडीची गरजच नाही! हायकोर्टाचे CBI वर ताशेरे

धाराशिव : नळदुर्ग किल्ल्यावरून आईची तीन मुलांसह उडी