Mumbai : पालिकेच्या उपाहारगृहात आरोग्याशी खेळ; ताकाच्या ग्लासात माशी, कांदा भजीत प्लास्टिकचा धागा 
मुंबई

Mumbai : पालिकेच्या उपाहारगृहात आरोग्याशी खेळ; ताकाच्या ग्लासात माशी, कांदा भजीत प्लास्टिकचा धागा

मुंबई महापालिका मुख्यालयात असलेल्या उपाहारगृहात पालिका अधिकारी, कर्मचारी, पोलीस, अभ्यासगत असे हजारो लोकांची ये-जा सुरू असते.

Swapnil S

मुंबई : मुंबई महापालिका मुख्यालयात असलेल्या उपाहारगृहात पालिका अधिकारी, कर्मचारी, पोलीस, अभ्यासगत असे हजारो लोकांची ये-जा सुरू असते. मात्र उपाहारगृहाने लोकांच्या आरोग्याशी खेळ मांडला आहे. ताकाच्या ग्लासात चक्क माशी तर कांदा भजीत प्लास्टिकचा धागा ३ जुलै रोजी सापडला होता. उपाहारगृहात कमल कॅटरस प्रा. लिमिटेड कंपनी व्यवस्थापनाचे निष्काळजीपणामुळे हजारो लोकांच्या आरोग्याशी खेळ मांडला आहे.

मुंबई महापालिका मुख्यालयात कमल कॅटरस प्रा. लिमिटेड कंपनी उपाहारगृहाचे व्यवस्थापन बघते. पालिका मुख्यालयात पाच हजारांहून अधिक अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत. उपाहारगृहात जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी पोलिसांसह अनेक मंडळी येत असतात. मात्र उपाहारगृहात अस्वच्छता, खाद्यपदार्थ उघडे ठेवणे यामुळे येणाऱ्याच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. याबाबत कमल कॅटरसचे व्यवस्थापक यांनी जास्त काही न बोलता अशी चूक पुन्हा होणार नाही, असे आश्वासन दिले.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

ऐन दिवाळीत मुंबईकरांचा लोकल प्रवास रखडणार! मध्य रेल्वेवर उद्या मेगाब्लॉक; हार्बर मार्गावरील लोकल रद्द, वाचा महत्त्वाचे अपडेट्स

Maharashtra Board Exam 2027 : दहावी-बारावीच्या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर! कोणता पेपर कधी? जाणून घ्या एका क्लिकवर

Mumbai : दरवाजात उभं राहण्यावरून वाद अन् हाणामारी! चर्चगेट-विरार लोकलमधून प्रवासी थेट फलाटावर पडला, Video

Mumbai : धारावी मलजल प्रक्रिया प्रकल्पाचे ७६ टक्के काम पूर्ण; मे २०२७ पर्यंत उभारणीचे लक्ष्य

पत्नी अन् दोन मुलं असतानाही मित्राच्या मुलीला लग्नाची मागणी; २० वर्षीय तरुणीनं नकार देताच उचललं टोकाचं पाऊल