Mumbai : ३० स्टॉल्सवर हातोडा; भायखळा, मुंबई सेंट्रलमध्ये 'पादचारी प्रथम'; नायर रुग्णालय मार्गावर २७ स्टॉल्सना नोटीस  प्रातिनिधिक छायाचित्र | X-mybmc
मुंबई

Mumbai : ३० स्टॉल्सवर हातोडा; भायखळा, मुंबई सेंट्रलमध्ये 'पादचारी प्रथम'; नायर रुग्णालय मार्गावर २७ स्टॉल्सना नोटीस

‘अतिक्रमणमुक्त’ फुटपाथ मोहिमेसाठी मुंबई पालिकेची धडक कारवाई सुरूच आहे. ‘पादचारी प्रथम’ अभियानांतर्गत शुक्रवारी भायखळा परिसरातील १५ अनधिकृत स्टॉल्सवर कारवाई करण्यात आली, तर मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाजवळ (पूर्व) नायर रुग्णालयाकडे येणाऱ्या मार्गावरील पदपथावर अडथळा ठरणारे १३ तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावरील दोन अशा एकूण १५ अनधिकृत स्टॉल्सवर हातोडा मारला.

Swapnil S

मुंबई : ‘अतिक्रमणमुक्त’ फुटपाथ मोहिमेसाठी मुंबई पालिकेची धडक कारवाई सुरूच आहे. ‘पादचारी प्रथम’ अभियानांतर्गत शुक्रवारी भायखळा परिसरातील १५ अनधिकृत स्टॉल्सवर कारवाई करण्यात आली, तर मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाजवळ (पूर्व) नायर रुग्णालयाकडे येणाऱ्या मार्गावरील पदपथावर अडथळा ठरणारे १३ तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावरील दोन अशा एकूण १५ अनधिकृत स्टॉल्सवर हातोडा मारला. तसेच मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाजवळ (पूर्व) नायर रुग्णालयाकडे येणाऱ्या मार्गावरील २७ स्टॉल्सधारकांनी जागेपेक्षा जास्त जागा व्यापलेली आढळली. अशा सर्व २७ स्टॉल्सधारकांना नोटीस बजावण्यात आली आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण बृहन्मुंबईमध्ये पदपथांवरील अनधिकृत फेरीवाले व अतिक्रमण तत्काळ हटवून पदपथ अडथळामुक्त करण्यासाठी महानगरपालिकेकडून ‘पादचारी प्रथम’ अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाला बळ देण्यासाठी बृहन्मुंबईतील सर्व प्रशासकीय विभागात मोठ्या प्रमाणावर कारवाई सुरू आहे. उप आयुक्त (परिमंडळ १) चंदा जाधव, सहायक आयुक्त आनंद कंकाळ यांच्या नेतृत्त्वाखाली ही कारवाई करण्यात आली.

२६० मीटर लांबीच्या पदपथांची सुधारणा

या अभियानांतर्गत भायखळा परिसरातील डॉ. आनंद राव नायर मार्गावरील नायर रुग्णालयाजवळ सुमारे २६० मीटर लांबीच्या पदपथांची सुधारणा व दुरुस्ती करण्यात आली. या पदपथांची सरासरी रुंदी ३.७५ मीटर असून, त्यापैकी सरासरी २.१५ मीटर रुंदीचा भाग पादचाऱ्यांना मुक्त व सलग वाहतुकीसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या परिसरातील १३ अनधिकृत स्टॉल्स निष्कासित करण्यात आले आहेत. नायर रुग्णालय परिसर असल्याने या पदपथाचा वापर मोठ्या प्रमाणात रुग्ण, त्यांचे नातेवाईक, रुग्णालयातील कर्मचारी तसेच इतर नागरिकांकडून केला जातो.

डॉ. आंबेडकर मार्गावर पदपथांची दुरूस्ती

भायखळा पूर्व रेल्वे स्थानकापासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मध्य रेल्वे रुग्णालय व वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालयाकडे जाणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावरील अंदाजे ४३५ मीटर लांबीच्या पदपथांची सुधारणा व दुरुस्ती करण्यात आली आहे. या पदपथाची सरासरी रुंदी ३.२५ मीटर असून, सरासरी १.५० मीटर रुंदीचा चालण्यायोग्य भाग उपलब्ध करून देण्यात आला आहे. या ठिकाणी असलेले २ अनधिकृत स्टॉल्स जमीनदोस्त करण्यात आले.

झाडाभोवती मातीच्या आळ्यांची दुरुस्ती

मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाजवळ (पूर्व) नायर रुग्णालयाकडे येणाऱ्या मार्गावरील पदपथावर असलेल्या २१ झाडांभोवतीच्या मातीच्या आळ्यांची दुरुस्ती करण्यात आली. तसेच काही झाडांच्या फांद्यांची छाटणीही करण्यात आल्याचे पालिका सूत्रांनी सांगितले.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

डीजेचे स्तोम संपलेले दिसेल; मुख्यमंत्र्यांचा दावा, लवकरच सरकार घेणार निर्णय, 'कायद्याचा बडगा नको, लोकांना विश्वासात घ्यायला हवे'

शिक्षक : समाजमन घडवणारे शिल्पकार

बुडीत कर्जाचा भार कुणाच्या डोक्यावर?

सप्टेंबर महिना कसा जाईल? बघा धनु आणि मकर राशीचे भविष्य

आजचे राशिभविष्य, ५ सप्टेंबर २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत