Mumbai : बांधकामस्थळी सेफ्टी नेट बंधनकारक; तरंच सीसी, ओसी, सभागृहाची मंजुरी प्रातिनिधिक छायाचित्र
मुंबई

Mumbai : बांधकामस्थळी सेफ्टी नेट बंधनकारक; तरंच सीसी, ओसी, सभागृहाची मंजुरी

मुंबईत पुनर्विकास आणि नव्या बांधकामांचा धडाका सुरू असताना बांधकामस्थळांवरील सुरक्षेचा मात्र पुरता बोजवारा उडतो. उंच इमारतींमधून सिमेंटचे ठोकळे, विटा, लोखंडी सळ्या आणि बांधकामाचे साहित्य थेट रस्त्यावर कोसळण्याचा धोका कायम असतो. मात्र आता बांधकाम ठिकाणी सेफ्टी नेट बसवणे बंधनकारक करण्यात येणार आहे.

Swapnil S

मुंबई : मुंबईत पुनर्विकास आणि नव्या बांधकामांचा धडाका सुरू असताना बांधकामस्थळांवरील सुरक्षेचा मात्र पुरता बोजवारा उडतो. उंच इमारतींमधून सिमेंटचे ठोकळे, विटा, लोखंडी सळ्या आणि बांधकामाचे साहित्य थेट रस्त्यावर कोसळण्याचा धोका कायम असतो. मात्र आता बांधकाम ठिकाणी सेफ्टी नेट बसवणे बंधनकारक करण्यात येणार आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक अजित रावराणे यांनी मांडलेल्या ठरावाच्या सूचनेची दखल घेत पालिका सभागृहाने मंजुरी दिली आहे.

मुंबईतील बांधकामस्थळांवर सुरक्षेच्या नियमांचे पालन होते की नाही, यावर प्रभावी नियंत्रण नसल्याने नागरिकांच्या जीविताचा प्रश्न निर्माण झाला आहे. बांधकाम सुरू असलेल्या इमारतींच्या शेजारून जाणारे पादचारी, दुचाकीस्वार आणि वाहनचालक यांना डोक्यावर कधी काय कोसळेल, याची भीती घेऊन प्रवास करावा लागत आहे. यापूर्वीही बांधकाम साहित्य कोसळून दुर्घटना घडल्या असून नागरिकांना जीव गमवावा लागला आहे, तर काहींना कायमचे अपंगत्व आल्याचे अजित रावराणे यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले.

रावराणे यांच्या सूचनेची दखल

विशेष म्हणजे, बांधकामस्थळाची प्रत्यक्ष पाहणी करून सर्व सुरक्षा उपाययोजनांची पूर्तता झाल्याची खात्री केल्यानंतरच बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्र (सीसी) आणि भोगवटा प्रमाणपत्र (ओसी) देण्याची कार्यपद्धती निश्चित करावी, अशी मागणी अजित रावराणे यांनी ठरावाच्या सूचनेद्वारे पालिका प्रशासनाकडे केली होती. अखेर नुकत्याच झालेल्या सभागृहात रावराणे यांची ठरावाची सूचना मंजूर करण्यात झाली असून पालिका प्रशासनाकडून लवकरच अंमलबजावणीला सुरुवात होईल, असे अधिकाऱ्याने सांगितले.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : गुरुवारी, शुक्रवारी पाणीबाणी; धारावी, वांद्रे, सांताक्रूझ, अंधेरी, भांडुपमध्ये पाणी नाही

अतिवेगाचे १३ बळी; राज्यात विविध अपघातांत २८ जखमी, १० गंभीर

Mumbai : आता १३०० झाडांचा बळी; गोरेगाव-मुलुंड लिंक रोडसाठी पालिकेने झाडांवर चिकटविल्या नोटिसा

नफावसुलीने पडझड; सेन्सेक्स १,४८४ अंकांनी कोसळला, गुंतवणूकदारांचे ५.१९ लाख कोटी बुडाले

नेपाळला १५ हजार कोटींच्या मदतीचे पॅकेज; पंतप्रधान मोदी-बालेन शाह यांची आठ करारांवर स्वाक्षरी