संग्रहित छायाचित्र
मुंबई

Mumbai : सभागृहाचे कामकाज उशिरा सुरू केल्याने विरोधी पक्ष आक्रमक; महापौरांच्या खुर्चीत बसण्याचा किशोरी पेडणेकर यांचा प्रयत्न

मुंबई महापालिकेच्या मुख्यालयात सोमवारी सभागृहाची बैठक आयोजित करण्यात आली होती. सभागृहात विरोधी पक्षनेत्यासह काँग्रेस, मनसे, सपाचे नगरसेवक उपस्थित होते. मात्र...

Krantee V. Kale

मुंबई : मुंबई महापालिकेच्या मुख्यालयात सोमवारी सभागृहाची बैठक आयोजित करण्यात आली होती. सभागृहात विरोधी पक्षनेत्यासह काँग्रेस, मनसे, सपाचे नगरसेवक उपस्थित होते. मात्र महापौर व भाजप महायुतीचे नगरसेवक उपस्थित नसल्याने विरोधकांनी घोषणाबाजी करत सभागृह दणाणून सोडले. विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी, तर महापौरांच्या खुर्चीत बसण्याचा प्रयत्न केला तसेच सगळीकडे हिंदू शब्दाचा वापर करू नका, अशा शब्दांत पेडणेकर यांनी सत्ताधारी पक्षाला ठणकावले.

दरम्यान, किशोरी पेडणेकर यांची समजूत काढली आणि गोंधळ शांत झाला. त्यानंतर पश्चिम बंगाल, आसाम व पुद्दुचेरी या तीन राज्यांत भाजपला घवघवीत यश मिळाल्याने सभागृहात अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला. भाजपच्या विजयानंतर सभागृहात मोदी मोदी, वंदे मातरम्, जय श्रीराम भारतमाता की जय, अशा घोषणांनी सभागृह दणाणून सोडले.

पाचपैकी तीन राज्यांत भाजपला घवघवीत यश मिळाले आजचा दिवस ऐतिहासिक आहे. पश्चिम बंगाच्या निवडणुकीत ज्या पद्धतीने यश मिळाले ते आमच्यासाठी ऐतिहासिक आहे. बंगालच्या निवडणुका लोकशाहीच्या मार्गाने जिंकल्या. आता जो बदल झालाय तो अनेकांची इच्छा असेल किंवा नसेल पण पाचवावं लागेल, असा टोला सभागृह नेते गणेश खणकर यांनी विरोधकांना लगावला.

महापौरांच्या खुर्चीत बसले तर काय चुकले?

सभागृह नेहमीच उशिराने सुरू होत आहे. त्यातच चार दिवसांपूर्वी स्थायी समिती अध्यक्ष यांना महापौरांच्या खुर्चीत बसवण्यात आले. महापालिका सभागृहात महापौर आणि उपमहापौर यांच्या अनुपस्थितीत परंपरेनुसार माजी महापौर यांना पीठासीन अधिकारी म्हणून बसवण्यात येते. मात्र, भाजपने सभागृहात ही परंपरा मोडीत काढली आणि स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांना महापौरांच्या खुर्चीत बसवले. मग आम्ही महापौरांच्या खुर्चीत बसलो तर काय चुकले, सभागृहात आमचे सर्व नगरसेवक वेळेनुसार उपस्थित होते आणि सत्ताधारी नगरसेवक उपस्थित नव्हते हे लक्षात घ्यावे, असे किशोरी पेडणेकर म्हणाल्या.

ही महाराष्ट्राची शोकांतिका

भाजपला तीन राज्यांत यश मिळाले त्याबद्दल त्यांचे अभिनंदन. जे घडले ते घडले. निवडणूक म्हटले तर हार-जीत होत असते. केरळ, तमिळनाडूमध्ये काय घडतेय याचा ही अंदाज घ्या तर दुसरीकडे ३ वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार केला आणि तिचा जीव घेतला यावर कोणी बोलत नाही, तर काय बोलणार. सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे आरोपीला पकडले, लहान मुलगी ती आपल्या महाराष्ट्रमध्ये राहतेय आणि कोणी एक शब्द बोलत नाही, ही मोठी शोकांतिका आहे, असा टोला किशोरी पेडणेकर यांनी लगावला.

कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली

आता ईव्हीएम हॅक हे उत्तर मिळणे अपेक्षित आहे. परंतु कारण काही असो. १२ वर्षे कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली त्याचे फळ आहे. आम्ही तिकडे असताना विजय झाला की आनंद होत असे पण पराभव झाला तर असे कसे झाले असे वाटत होते, अशा शब्दांत पालिकेतील शिंदे यांच्या सेनेचे गटनेते अमय घोले म्हणाले.

सभागृह केले स्थगित

पुण्याच्या घटनेबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की शिक्षा होईपर्यंत स्वस्त बसणार नाही, असे स्पष्ट केले आहे. अखेर सभागृह स्थगित करत गुरुवारी दुपारी सभागृहाची बैठक होईल, असे उपमहापौर संजय घाडी यांनी जाहीर केले.

IIT मुंबईतील विद्यार्थ्याची आत्महत्या; परीक्षेत ChatGPT वापरल्याचा आरोप, प्रशासनाविरोधात विद्यार्थ्यांचे आंदोलन

Ulhasnagar : धुक्याच्या आड रात्री ‘केमिकल गॅस’चा खेळ? उग्र वास अन् धुक्याची चादर; जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

Ganeshotsav 2026 : गणपतीच्या सजावटीत FDA ची झलक; तुकाराम मुंढेंच्या कामाला अनोख्या पद्धतीने सलाम, Video

Mumbai : ‘त्या’ फुटबॉल मैदानावर ‘एमएफए’चा अधिकार नाही; म्हाडाची उच्च न्यायालयात माहिती

Mumbai : पालिकेने SIR साठी मोजले १०.८१ कोटी रुपये; चार महिन्यांत १,३०४ डेटा एंट्री ऑपरेटरची नियुक्ती