Mumbai : सहा मजली इमारत, सांस्कृतिक दालन, व्यायामशाळा, प्रशस्त सभागृह; नवीन पालिका सभागृहात आसन क्षमता १०० ने वाढणार 
मुंबई

Mumbai : सहा मजली इमारत, सांस्कृतिक दालन, व्यायामशाळा, प्रशस्त सभागृह; नवीन पालिका सभागृहात आसन क्षमता १०० ने वाढणार

४ नोव्हेंबर रोजी स्थायी समितीच्या बैठकीत प्रस्ताव मंजुरीसाठी सादर करण्यात येणार आहे. या मंजुरीनंतरची प्रक्रिया पार पाडत पुढील दोन वर्षांत ३३२ आसनी क्षमता असलेले सभागृह नगरसेवकांच्या सेवेत असणार आहे.

Swapnil S

मुंबई : सांस्कृतिक दालन, व्यायामशाळा, पार्किंग, सहा मजली प्रशस्त सभागृहास पालिका आयुक्तांनी नुकतीच मंजुरी दिली आहे. त्यांनंतर बुधवार ४ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत प्रस्ताव मंजुरीसाठी सादर करण्यात येणार आहे. स्थायी समितीच्या मंजुरीनंतर पुढील प्रक्रिया पार पाडत पुढील दोन वर्षांत ३३२ आसनी क्षमता असलेले सभागृह नगरसेवकांच्या सेवेत असणार आहे. यासाठी पालिका ३८ कोटी रुपये खर्च करणार आहे.

पालिका मुख्यालयातील जुन्या सभागृहात २२७ नगरसेवक बसवण्याणी आसन व्यवस्था अपुरी पडत असल्याने आता मुंबई महापालिकेच्या मुख्यालयासमोर असलेल्या आझाद मैदानावरील क्रीडा भवनाच्या जागेत प्रशस्त सहा मजली इमारतीत ३३२ आसन व्यवस्था, महापौरांचे दालन, राजकीय पक्षांची कार्यालये असलेल्या नवीन सभागृह उभारण्यात येणार आहे. नवनी सभागृहामुळे आसन क्षमता १०० ने वाढणार आहे.‌ विशेष म्हणजे पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी मंजुरी दिली. आयुक्तांच्या मंजुरीनंतर नवीन सभागृह उभारणीचा मार्ग मोकळा झाला असून राज्य सरकारच्या अखत्यारीतील जागा पालिकेच्या ताब्यात मिळावी यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहिल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

सध्या पालिका मुख्यालयातील सभागृहात २२७ निवडून आलेले आणि १० नामनिर्देशित अशा २३७ सदस्यांची व्यवस्था आहे. मात्र भविष्यात सदस्य संख्येत वाढ होण्याची शक्यता गृहित धरून नव्या सभागृहात ३३२ नगरसेवकांसाठी आसन व्यवस्था करण्यात येणार आहे.

पार्किंगची सुविधा

सुमारे ९०० चौरस मीटर जागेवर उभारण्यात येणाऱ्या या सहा मजली इमारतीत तळमजल्यावर सुमारे ६० वाहनांच्या पार्किंगची सुविधा असेल. पहिला आणि दुसरा मजला पोडियमसाठी राखीव असेल. तिसऱ्या मजल्यावर मुंबई महानगरपालिका कर्मचाऱ्यांसाठी व्यायामशाळा उभारण्यात येणार आहे. चौथ्या मजल्यावर महापौर आणि विविध राजकीय पक्षांच्या गटनेत्यांची कार्यालये बनवण्यात येणार आहेत.

कॉर्पोरेशन हॉल, मीडिया गॅलरी

पाचवा आणि सहावा मजला एकत्रित करून अत्याधुनिक थिएटर-शैलीतील कॉर्पोरेशन हॉल तयार करण्यात येणार आहे. या सभागृहात नगरसेवकांसोबतच पत्रकारांसाठी स्वतंत्र मीडिया गॅलरी आणि पालिका सभांसाठी तांत्रिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

अशी असेल नवी इमारत!

  • तळमजला : ६० वाहनांसाठी पार्किंग

  • पहिला व दुसरा मजला : पोडियम

  • तिसरा मजला : कर्मचाऱ्यांसाठी जिम्नॅशियम, बॅडमिंटन

  • चौथा मजला : महापौर, उपमहापौर व राजकीय पक्षांच्या गटनेत्यांची कार्यालये

  • पाचवा व सहावा मजला : ३३२ आसनक्षमतेचे थिएटर- सभागृह व मीडिया गॅलरी

(संबधित इंग्रजी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

'मुरासू' चक्रीवादळाचा धोका वाढला; चेन्नईत शाळा-कॉलेजला सुट्टी; आंध्रला रेड अलर्ट, महाराष्ट्रातही पावसाचा इशारा

Thane : येऊरमध्ये ‘हॅलोविन पार्टी’वर पोलिसांची धाड; ७० हून अधिक तरुण-तरुणी उपस्थित, मद्यपान आणि प्रतिबंधित ई-सिगारेटचा वापर

LPG Price Hike : दिवाळीच्या तोंडावर व्यावसायिक गॅस सिलिंडर महागला; घरगुती एलपीजी सिलिंडरचे दर स्थिर

कर्जतमध्ये १०० एकरावर ‘अनंत आश्रय’; अनाथ, दिव्यांग आणि ज्येष्ठांसाठी वसाहत; पाच हजारांसाठी आयुष्यभराचा निवारा

Mumbai : काजू-अंजीर कतली, बर्फीनेही खाल्ला भाव; खरेदीसाठी आधीच बुकींग