फुटपाथवर यापुढे दुचाकींना नो एन्ट्री! ३८४ कोटी रुपये खर्चून रेलिंग्ज व बोलार्ड्स बसवणार  प्रातिनिधिक छायाचित्र
मुंबई

Mumbai : फुटपाथवर यापुढे दुचाकींना नो एन्ट्री! ३८४ कोटी रुपये खर्चून रेलिंग्ज व बोलार्ड्स बसवणार

मुंबईतील विशेष करून जंक्शनवर वाहतूककोंडी झाल्यास दुचाकीस्वार फुटपाथवरून आपली वाहने घेऊन जात असल्याचे निदर्शनास आले आहे. फुटपाथ हे पादचाऱ्यांना चालण्यासाठी असून आता ३८४ कोटी ९८ लाख २३ हजार रुपये खर्च करून फुटपाथवर रेलिंग्ज व बोलार्ड्स बसवण्यात येणार आहेत.

Swapnil S

मुंबई : मुंबईतील विशेष करून जंक्शनवर वाहतूककोंडी झाल्यास दुचाकीस्वार फुटपाथवरून आपली वाहने घेऊन जात असल्याचे निदर्शनास आले आहे. फुटपाथ हे पादचाऱ्यांना चालण्यासाठी असून आता ३८४ कोटी ९८ लाख २३ हजार रुपये खर्च करून फुटपाथवर रेलिंग्ज व बोलार्ड्स बसवण्यात येणार आहेत. रेलिंग्ज व बोलार्ड्स बसवताना व्हिलचेअर ये-जा करू शकेल, अशी जागा उपलब्ध करण्यात येणार असल्याचे मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांनी सांगितले.

मुंबईतील फुटपाथ हे पादचाऱ्यांना चालण्यासाठी आहेत. परंतु फुटपाथवर बेकायदा फेरीवाल्यांनी कब्जा केला असून त्यावरून दुचाकी वाहने जातात कशी, मुंबई महापालिका काही उपाययोजना करणार का, असा सवाल मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला केला आहे. पालिकेच्या आदेशानंतर आता फुटपाथच्या प्रवेशद्वारावर दोन्ही बाजूंना रेलिंग्ज व बोलार्ड्स बसवण्यात येणार आहेत.

पादचारी सुरक्षेला प्राधान्य देत वाहनांची अनधिकृत पार्किंग, फुटपाथवर होणारे अतिक्रमण आणि बेकायदेशीर प्रवेश रोखण्यासाठी ही उपाययोजना करण्यात येत आहे. जीएफआरसी साहित्य टिकाऊ, गंजरोधक आणि दीर्घकाळ टिकणारे असल्याने देखभाल खर्च तुलनेने कमी राहणार असल्याचे पालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

फुटपाथ मोकळे होणार का?

या प्रकल्पाचा प्रमुख उद्देश म्हणजे फुटपाथवरील अतिक्रमण आणि दुचाकी किंवा चारचाकी वाहनांची घुसखोरी थांबविणे. रेलिंग्ज व बोलार्ड्स बसविल्यास दुचाकी वाहनांना फुटपाथवर चढणे कठीण होणार आहे. त्यामुळे पादचाऱ्यांसाठी मार्ग अधिक सुरक्षित व मोकळा राहण्याची अपेक्षा आहे. विशेषतः शाळकरी मुले, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग व्यक्तींसाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार आहे. शहरातील वाढती वाहतूक आणि बेशिस्त पार्किंगच्या पार्श्वभूमीवर हा प्रकल्प प्रभावीपणे राबविला गेला तर मुंबईकरांना दिलासा मिळू शकतो.

IIT बॉम्बेतील साहिल वाकोडे आत्महत्येप्रकरणी प्राध्यापक निलंबित; 'त्या' निवेदनावरून संस्थेची माफी

Mumbai : ‘बटरफ्लाय’ रोखणार पाणी गळती; जलवाहिन्यांवर बटरफ्लाय झडपा बसवणार, गणेश खणकर यांच्या मागणीची दखल

Mumbai : चौपाटी, विसर्जनस्थळी चोख व्यवस्थापन; देशभरातील तज्ज्ञांकडून पालिका, पोलिसांचे कौतुक

गणेश विसर्जनासाठी BMC सज्ज; ३८३ कृत्रिम तलावांची व्यवस्था, ६७ नैसर्गिक विसर्जनस्थळांवरही सुविधा, २५ हजार अधिकारी-कर्मचारी तैनात

बार्सिलोनामध्ये ‘गणपती बाप्पा मोरया’; महाराष्ट्र मंडळ स्पेनतर्फे गणेशोत्सव, स्पॅनिश कलाकारांचाही सहभाग