Mumbai : फुटपाथवर आता कमी उंचीची सावली देणारी झाडे; BMC देणार उद्यान विभागाला धडे संग्रहित छायाचित्र
मुंबई

Mumbai : फुटपाथवर आता कमी उंचीची सावली देणारी झाडे; BMC देणार उद्यान विभागाला धडे

चेंबूर येथे स्कूल व्हॅनवर पिंपळाचे झाड कोसळून विहानचा करुण अंत झाला. या घटनेनंतर मुंबई महापालिका खडबडून जागी झाली आहे.

Swapnil S

मुंबई : चेंबूर येथे स्कूल व्हॅनवर पिंपळाचे झाड कोसळून विहानचा करुण अंत झाला. या घटनेनंतर मुंबई महापालिका खडबडून जागी झाली आहे. जपानच्या धर्तीवर मुंबईतील फुटपाथवर सावली देणारी कमी उंचीची झाडे लावण्याची चाचपणी सुरू झाली आहे. तसेच कुठली झाड कुठे लावायची, याचे धडे मुंबई महापालिका तज्ज्ञ व्यक्तींच्या माध्यमातून उद्यान विभागातील अधिकारी व कर्मचारी यांना देणार आहे. झाडाविषयी नगरसेवक व मुंबईकरांमध्ये जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे. चेंबूरच्या घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी आराखडा तयार केला असून येत्या आठवड्यात आयुक्तांसमोर सादरीकरण करण्यात येणार आहे.

मुंबईच्या भौगोलिक आणि भूगर्भीय परिस्थितीनुसार कोणत्या ठिकाणी कोणत्या प्रजातीची झाडे लावावीत, याबाबत जागरूकता सर्वसामान्यांमध्ये निर्माण केली जाणार आहे. अनेकदा स्थानिक परिस्थितीचा विचार न करता झाडे लावली जात असल्याने पावसाळ्यात झाडे किंवा त्यांच्या फांद्या कोसळण्याच्या घटना घडतात.

वैज्ञानिक झाड कोसळण्याच्या घटना टाळण्यासाठी नियोजनावर भर दिला जाणार आहे. यासाठी शहरातील सर्व २३७प्रभागांमध्येही माहितीपर कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. मुंबईची जमीन खडकाळ असल्यामुळे झाडांच्या मुळ्या खोलवर न जाता आडव्या दिशेने पसरतात. त्यात झाडांभोवती होणारे सिमेंटीकरण, विकासकामांदरम्यान झाडाच्या मुळांची होणारी कापणी आणि पावसाळ्यात वाढलेले वजन यामुळे झाडे किंवा फांद्या कोसळण्याचा धोका वाढतो. त्यामुळे स्थानिक हवामान आणि जमिनीला अनुरूप देशी प्रजातींची झाडे लावण्यावर भर देण्यात येईल.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

IPO चा जोर कायम; जिओ प्लॅटफॉर्म्ससह डझनभर कंपन्या प्राथमिक बाजारात उतरणार

जंतर-मंतरवर आता आंदोलन करता येणार नाही; दिल्ली पोलिसांचा मोठा निर्णय, तीन नवी ठिकाणे निश्चित

WhatsApp वर आता मेसेज शेड्यूल करता येणार; ठरलेल्या वेळी आपोआप पाठवला जाणार, जाणून घ्या फीचर कसं काम करणार

Mumbai : कोस्टल रोडवर उभारणार अत्याधुनिक बायो टॉयलेट; पालिका करणार ४ कोटी १९ लाख रुपये खर्च

Period Problems : महिन्यातून दोनदा पाळी येतेय? महिलांनो, दुर्लक्ष करू नका; डॉक्टर सांगतात...