Mumbai : शाळेच्या मैदानावर खो-खो, कबड्डी, बास्केटबॉल, फुटबॉलच्या सुविधा; महापालिका २ कोटी ७१ लाख रुपये खर्च करणार संग्रहित छायाचित्र
मुंबई

Mumbai : शाळेच्या मैदानावर खो-खो, कबड्डी, बास्केटबॉल, फुटबॉलच्या सुविधा; महापालिका २ कोटी ७१ लाख रुपये खर्च करणार

कबड्डी, खो-खोसाठी लाल मातीच्या स्वतंत्र खेळपट्ट्या, बास्केटबॉल, फुटबॉलसह अन्य खेळांसाठी सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे.

Swapnil S

मुंबई : कबड्डी, खो-खोसाठी लाल मातीच्या स्वतंत्र खेळपट्ट्या, बास्केटबॉल, फुटबॉलसह अन्य खेळांसाठी सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे. मालाड पूर्व येथील पालिका शाळेच्या मैदानाची दुरुस्ती आणि दर्जोन्नती करण्यात येणार आहे. यासाठी मुंबई पालिका २ कोटी ७१ लाख ३१ हजारांचा खर्च करणार आहे.

मालाड पूर्व येथील पुष्पा पार्क पालिका शाळेच्या मैदानाचे क्षेत्रफळ २, ६६० चौरस मीटर आहे. मैदानाची दुरुस्ती करून आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्याचे पालिकेचे नियोजन आहे. पालिकेच्या शिक्षणाधिकाऱ्यांनीही या कामाची शिफारस केली आहे.

बहुउद्देशीय खेळपट्टी तयार करणार

मैदानात बास्केटबॉल, व्हॉलीबॉल, बॅडमिंटन आणि फुटबॉल या खेळांसाठी ईपीडीएम साहित्याची बहुउद्देशीय खेळपट्टी तयार करण्यात येणार आहे. याशिवाय कबड्डी आणि खो-खोसाठी लाल मातीच्या स्वतंत्र खेळपट्ट्या उभारण्यात येतील. मुलांसाठी खेळण्याची साधने बसविणे, मैदानात लाल मातीचा भराव टाकणे आणि विद्युत खांबांवर दिवे बसवणे, अशी कामेही प्रस्तावित आहेत.

संरक्षक भिंतीची पुनर्बांधणी

मैदानाच्या अंतर्गत परिघात पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी बॉक्स ड्रेन आणि त्यावर १.७ मीटर रुंदीचा स्टॅम्प काँक्रीटचा पदपथ तयार केला जाणार आहे. सध्या जीर्ण अवस्थेत असलेल्या संरक्षक भिंतीचे निष्कासन करून तिची पुनर्बांधणी करण्यात येणार आहे तसेच मीटर रूम आणि सुरक्षारक्षकासाठी खोली बांधण्याचेही नियोजन आहे.

कंत्राटदाराची निविदा सर्वांत कमी बोली

या कामासाठी मे. एम. आर. एंटरप्रायजेस, मे. पी. एच. ब्रदर्स आणि मे. हिरानी एंटरप्रायजेस यांनी सहभाग घेतला. त्यापैकी मे. एम. आर. एंटरप्रायजेस यांची निविदा सर्वांत कमी दराची असल्याने ती स्वीकारण्याची शिफारस प्रमुख अभियंत्यांनी केली आहे.

साडेपाच लाखांचा सल्ला

या कामाच्या अंदाजपत्रकाची तयारी, निविदेचा मसुदा तयार करणे आणि कामाचे पर्यवेक्षण करण्यासाठी मे. इन्फ्रा कन्सल्ट्स यांची प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मे. इन्फ्रा कन्सल्ट्स यांची प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराला ५ लाख ५४ हजार ८३ रुपये ५८ पैसे सल्लागार शुल्क मंजूर करण्यात आले आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : गरबा, दांडिया सुरक्षेवर पोलिसांचे विशेष लक्ष; मंडळांपासून मैदानांपर्यंत वाढता पहारा, महिला आणि मुलांच्या सुरक्षेला प्राधान्य

Mira-Bhayandar : पोलिसांनी थकविली ११ कोटींची थकबाकी; जप्त वाहने ठेवण्यासाठी दिली होती जागा

Palghar : संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेसाठी खा. डॉ. हेमंत सवरा यांची निवड

Raigad : विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा संशय; पतीला अटक, चौघांवर गुन्हा दाखल

Navi Mumbai : २५० कुटुंबांचे घराचे स्वप्न अधांतरी! पैसे भरूनही वर्षभरापासून घरांचा ताबा मिळत नसल्याने खरेदीदार त्रस्त