प्रातिनिधिक छायाचित्र  
मुंबई

पाणीपुरवठा होणार अधिक सुरळीत; १० हजार लिटरचे २२ पाण्याचे टँकर खरेदी करणार; BMC करणार १० कोटी ४४ लाख रुपये खर्च

मुंबईतील पाणीपुरवठा सुरळीत व्हावा यासाठी मुंबई महापालिकेने १० हजार लिटरचे २२ पाण्याचे टँकर खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी १० कोटी ४४ लाख १९ हजार ४६८ रुपये खर्च करण्यात येणार आहेत.

Swapnil S

मुंबई : मुंबईतील पाणीपुरवठा सुरळीत व्हावा यासाठी मुंबई महापालिकेने १० हजार लिटरचे २२ पाण्याचे टँकर खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी १० कोटी ४४ लाख १९ हजार ४६८ रुपये खर्च करण्यात येणार आहेत.

मुंबईत वॉटर टँकरची संख्या कमी असल्याने सोसायटीतील रहिवाशांना वेळेवर महापालिकेचे टँकर उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारी मुंबईकर स्थानिक नगरसेवकांकडे करत असतात. वाढत्या तक्रारी लक्षात घेता मुंबईतील पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी पालिकेने वॉटर टँकर वाढविण्याची मागणी नगरसेवकांनी केली होती. त्यानुसार आता २२ नवीन वॉटर टँकर खरेदी करण्याचा निर्णय महानगरपालिका प्रशासनाने घेतल्याचे दिसून येत आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये दैनंदिन कामासाठी तसेच मुख्य जलवाहिनी दुरुस्ती, दूषित पाणीपुरवठा, अपुरा पाणीपुरवठा, सार्वजनिक उत्सव, निवडणूक कार्यक्रम, विविध सरकारी कार्यक्रम, आपत्कालीन परिस्थिती आदी प्रसंगी जलवाहकांची सेवा पुरविण्याची मागणी जल अभियंता विभागाद्वारे आणि पालिकेच्या विविध विभाग कार्यालयामार्फत केली जाते. मात्र, सद्यस्थितीत कार्यकारी अभियंता (परिवहन) पाणीपुरवठा उपविभागात ३७पाण्याचे टँकर्स असून त्यांच्यामार्फत

शहर, पश्चिम उपनगरे व पूर्व उपनगरे येथील विविध विभागांना पिण्याचे पाणी पुरविण्यात येते. अशावेळी पाण्याच्या टँकर्सअभावी अनेक विभागात पालिकेला पाणीपुरवठा करण्यास मोठा अडथळा येतो. यामुळे आता पालिकेने या समस्यांपासून नागरिकांची सुटका व्हावी, याकरिता १० हजार लिटरचे २२ पिण्याच्या पाण्याचे टँकर्स खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे.

देशात सर्वात कोरडा मान्सून; एल-निनोचा फटका; सरासरीपेक्षा १५ टक्के कमी पाऊस

Mumbai : फेरीवाल्यांवरील कारवाईत समन्वयाचा अभाव; विधी समितीत हरकतीचा मुद्दा

Mumbai : खारमधील पुनर्विकासाला मंजुरी; रामकृष्णनगरच्या रहिवाशांना मिळणार मोठी घरे

Mumbai : चॉकलेटपासून साकारला नक्षीदार बाप्पा; ४ फूट उंच, तर ७५ किलो वजनाची मूर्ती

उद्घाटनापूर्वीच श्रेयाची 'लढाई'; जिजाऊ प्रवेशद्वारावर पालकमंत्र्यांचे नाव; मराठा समाजासह विविध संघटनांचा विरोध, नाव हटविण्याची मागणी