Mumbai : महसूल अधिकाऱ्यांना हायकोर्टाचा दणका; पुनर्विकास रखडल्याबद्दल ७ लाखांचा दंड (संग्रहित छायाचित्र)
मुंबई

Mumbai : महसूल अधिकाऱ्यांना हायकोर्टाचा दणका; पुनर्विकास रखडल्याबद्दल ७ लाखांचा दंड

मालमत्तेच्या नोंदींमध्ये खरेदीदाराचे नाव वेळेत नोंदवण्यात महसूल यंत्रणेने केलेल्या दिरंगाईमुळे गृहनिर्माण संस्थेचा पुनर्विकास सात वर्षांहून अधिक काळ रखडल्याबद्दल उच्च न्यायालयाने कठोर भूमिका घेतली आणि महसूल अधिकाऱ्यांना दणका देत पुनर्विकास रखडल्याबद्दल ७ लाखांचा दंड ठोठावला.

Swapnil S

मुंबई : मालमत्तेच्या नोंदींमध्ये खरेदीदाराचे नाव वेळेत नोंदवण्यात महसूल यंत्रणेने केलेल्या दिरंगाईमुळे गृहनिर्माण संस्थेचा पुनर्विकास सात वर्षांहून अधिक काळ रखडल्याबद्दल उच्च न्यायालयाने कठोर भूमिका घेतली आणि महसूल अधिकाऱ्यांना दणका देत पुनर्विकास रखडल्याबद्दल ७ लाखांचा दंड ठोठावला. दहिसर येथील २८९ सभासदांच्या अवधूत सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या प्रकरणात न्यायमूर्ती कमल खाता यांनी हा आदेश दिला. दंडाची रक्कम दोन आठवड्यांत संस्थेला देण्याचे निर्देश न्यायालयाने दिले.

दहिसर पूर्व येथील श्री अवधूत सहकारी गृहनिर्माण संस्थेने १९७९ मध्ये नोंदणीकृत खरेदीखताद्वारे संबंधित जमीन खरेदी केली होती. संस्थेने आवश्यक परवानग्या घेऊन त्या जागेवर चार मजली पाच इमारती उभारल्या. या इमारतींमध्ये २८९ सदनिकाधारक वास्तव्याला आहेत. संस्थेला १९८१ मध्ये इमारतींसाठी पूर्ण भोगवटा प्रमाणपत्रही मिळाले. २०१७ मध्ये जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाची प्रक्रिया सुरू करण्यात आली.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

‘रेटकार्ड’ बंधनकारक; खासगी रुग्णालयांत दर्शनी भागांत दरपत्रक लावणे आवश्यक, नियमभंग करणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई

Mumbai : हॉटेलचे खाणे महागणार; सर्व पदार्थांच्या दरात १० ते १५ टक्के होणार वाढ, ‘आहार’ संघटनेचा निर्णय

Mumbai : अनधिकृत बांधकामांवर बुलडोझर; दिल्लीच्या धर्तीवर वांद्रे, खार, सांताक्रूझमधील अमली पदार्थ तस्करांची बांधकामे पाडली

छ. संभाजीनगर : फळबागा वाचवण्याचे मोठे आव्हान; ठिबक सिंचन, टँकर, महागड्या पाण्यावर शेतकऱ्यांची भिस्त

सामना पाणीटंचाईशी