Mumbai : मराठीत OTP सांगितल्यामुळे संतापला कॅबचालक; प्रवाशासोबत घातली हुज्जत, VIDEO व्हायरल 
मुंबई

Mumbai : मराठीत OTP सांगितल्यामुळे संतापला कॅबचालक; प्रवाशासोबत घातली हुज्जत, VIDEO व्हायरल

हा व्हिडीओ महाराष्ट्रातील रिक्षा आणि टॅक्सीचालकांसाठी मराठी भाषेचे व्यवहारज्ञान अनिवार्य करण्याच्या नियमाची अंमलबजावणी सुरू झाल्याच्या दिवशीच समोर आला आहे. त्यामुळे सोशल मीडियावर या व्हिडीओची चर्चा रंगली आहे.

Mayuri Gawade

महाराष्ट्रात रिक्षा आणि टॅक्सीचालकांसाठी मराठीचे व्यवहारज्ञान अनिवार्य करण्याच्या नियमाची अंमलबजावणी सुरू होत असतानाच भाषेवरून कॅबचालक आणि प्रवाशामध्ये झालेल्या वादाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. प्रवाशाने कॅब राइडचा चार अंकी ओटीपी मराठीत सांगितल्यानंतर चालकाने तो इंग्रजीत सांगण्यास सांगितले. त्यानंतर “अ‍ॅप इंग्रजीत आहे की मराठीत?” असा सवाल चालकाने केला आणि दोघांमध्ये मराठीच्या वापरावरून शाब्दिक वाद रंगला.

व्हायरल व्हिडीओमध्ये काय दिसतंय?

व्हायरल व्हिडीओमध्ये कॅबमध्ये बसलेला प्रवासी चालकाला राइडचा चार अंकी OTP मराठीत सांगताना दिसतो. मात्र, चालकाने OTP इंग्रजीत सांगण्यास सांगितल्याचे व्हिडीओमध्ये ऐकू येते. यावरून दोघांमध्ये शाब्दिक वाद सुरू होतो.

वाद वाढल्यानंतर चालक मोबाईल डॅशबोर्डवर ठेवून प्रवाशालाच OTP टाकण्यास सांगतो. याचवेळी तो, ‘अॅप इंग्रजीत आहे की मराठीत?’ असा प्रश्न विचारतो. त्यावर प्रवासी, "तुम्ही महाराष्ट्रात गाडी चालवत आहात आणि तुम्हाला परवाना महाराष्ट्राने दिला आहे," असे म्हणताना ऐकू येतो.

आजपासूनच मराठीचा नियम लागू

विशेष म्हणजे, हा व्हिडीओ महाराष्ट्रातील रिक्षा आणि टॅक्सीचालकांसाठी मराठी भाषेचे व्यवहारज्ञान अनिवार्य करण्याच्या नियमाची अंमलबजावणी सुरू झाल्याच्या दिवशीच समोर आला आहे. त्यामुळे सोशल मीडियावर या व्हिडीओची चर्चा रंगली आहे.

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या माहितीनुसार, २० ऑगस्टपासून या नियमाची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. प्रवाशांशी व्यवहार करता यावा, इतके मराठी भाषेचे ज्ञान रिक्षा आणि टॅक्सीचालकांना असणे अपेक्षित आहे.

Ola-Uber-Rapido चालकांनाही नियम

हा नियम केवळ काळी-पिवळी टॅक्सी किंवा पारंपरिक रिक्षांपुरता मर्यादित नसून Ola, Uber आणि Rapidoसारख्या ॲप-आधारित सेवांशी जोडलेल्या चालकांनाही लागू असल्याचे सांगण्यात आले आहे.

दरम्यान, व्हायरल व्हिडीओ नेमका कधी आणि कुठे शूट करण्यात आला, तसेच संबंधित कॅब कोणत्या कंपनीची होती, याची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. त्यामुळे व्हिडीओतील दाव्यांची स्वतंत्र पुष्टी झालेली नाही.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

BMC Gen Z Fellowship 2026 : पालिकेच्या कारभारात आता Gen Z चा सहभाग! ५० तरुणांना मिळणार कामाची संधी, कसं कराल अप्लाय?

नऊ वर्षांत ४४७ प्रवासी 'नो फ्लाय लिस्ट'मध्ये; विमानात गोंधळ घालणाऱ्यांवर DGCA ची कठोर कारवाई

शाळा, कॉलेज, रुग्णालय परिसरातून भटके कुत्रे हद्दपार; शेल्टरसाठी मुंबई बाहेरील जागेची पालिकेकडून चाचपणी

पुणे पुन्हा हादरले! जुन्नरमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून खून; मुलीचा शोध घेण्याचा आरोपीने केला बनाव

Mumbai : ६३८ आस्थापनांना न्यायालयात खेचले; मराठी पाट्यांकडे दुर्लक्ष भोवले; शॉपिंग मॉल, नामांकित आस्थापना रडारवर