संग्रहित छायाचित्र  
मुंबई

Mumbai : सेंट्रल पार्कला गती; महालक्ष्मी रेस कोर्सवरील उद्यानासाठी रिलायन्सकडून आर्किटेक्टची नियुक्ती

कोस्टल रोड प्रकल्पात १७० एकर जमिनीवर उद्यान आणि रेस कोर्सच्या १२० एकर एकूण २९० एकर जमिनीवर मुंबई सेंट्रल पार्क साकारण्याच्या हालचालींना वेग आला आहे. रिलायन्सने डिझाईन तयार करण्यासाठी आर्किटेक्टची नियुक्ती केली आहे.

गिरीश चित्रे

मुंबई : कोस्टल रोड प्रकल्पात १७० एकर जमिनीवर उद्यान आणि रेस कोर्सच्या १२० एकर एकूण २९० एकर जमिनीवर मुंबई सेंट्रल पार्क साकारण्याच्या हालचालींना वेग आला आहे. रिलायन्सने डिझाईन तयार करण्यासाठी आर्किटेक्टची नियुक्ती केली आहे.

विशेष म्हणजे विदेशातील धर्तीवर डिझाइन असणार आहे. आर्किटेक्टने डिझाइन तयार केल्यानंतर उपायुक्त अजितकुमार आंबी यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त समिती डिझाइन फायनल करणार आहे. त्यामुळे पुढील दोन वर्षांत २९० एकर जमीनीवर साकारण्यात येणाऱ्या सेंट्रल पार्क मध्ये मुंबईकरांना आनंद लुटता येणार आहे.‌

दक्षिण मुंबईतील महालक्ष्मी येथील रेस कोर्सची एकूण २११ एकर जमीन आरडब्ल्यूआयटीसीला भाडेपट्ट्यावर देण्यात आली होती. त्याची मुदत संपल्यानंतर या जागेपैकी १२० एकर जागा राज्य सरकारमार्फत पालिकेच्या ताब्यात आली आहे पालिकेला सुपूर्द केलेल्या १२० एकर तसेच रेसकोर्स परिसराला लागून असलेल्या मुंबई किनारी रस्ता प्रकल्पाची (कोस्टल रोड) १७० एकर असे दोन्ही मिळून एकूण २९० एकर जागेवर मुंबई सेंट्रल पार्क विकसित करण्यात येणार आहे. रिलायन्सच्या माध्यमातून सीएस आर फंडातून सेंट्रल पार्क विकसित करण्यात येणार आहे.

रिलायन्स इंडस्ट्रीजने सेंट्रल पार्क प्रत्यक्षात साकारण्यासाठी आता आर्किटेक्टची नियुक्ती केली आहे. आर्किटेक्टने दिलेल्या डिझाइनचा अभ्यास पालिकेने नियुक्त केलेली समिती करणार आहे. त्यात सीआरझेडचे उल्लंघन होते का, डिझाइन कशा प्रकारे तयार केली आहे, याचा अभ्यास समिती करणार असल्याचे पालिका प्रशासनातील अधिकाऱ्याने सांगितले.

...अशी आहे समिती

  • अजितकुमार आंबी, उपायुक्त - अध्यक्ष

  • मतय्या स्वामी, प्रमुख अभियंता रस्ते - सदस्य

  • सहायक आयुक्त (जी दक्षिण, डी वार्ड ) - सदस्य

  • उद्यान अधीक्षक - सदस्य

  • अभियंता (दोन) - सदस्य

डिसेंबरपर्यंत उन्हाचे चटके बसणार! एल निनोची तीव्रता वाढणार, सरासरीपेक्षा अधिक तापमान राहणार

ज्ञानेश कुमार यांच्यावरील याचिकांवर आज सुनावणी

ज्ञानेशांविरोधात 'गर्जना'; सर्वपक्षीय मोर्च्यात राज्यातील SIR रद्द करण्याची मागणी

नागरिकांचे मत काढून घेणारी प्रक्रिया मनमानी; सर्वोच्च न्यायालयाचे न्या. उज्ज्वल भुयान यांची चपराक

GST अधिकाऱ्यांवर आता लागणार लगाम; जीएसटी अंमलबजावणीत व्यापक सुधारणा होणार