प्रातिनिधिक छायाचित्र  
मुंबई

Mumbai : मध्य रेल्वे मार्गावर आज मेगाब्लॉक

मध्य रेल्वेच्या उपनगरीय विभागावर आज (२२ फेब्रुवारी) अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. मुख्य मार्गावर मुलुंड आणि ठाणे स्थानकांदरम्यान सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत अप आणि डाऊन धीम्या मार्गावर ब्लॉक असेल, तर हार्बर मार्गावर पनवेल ते वाशी स्थानकांदरम्यान ब्लॉक असणार आहे.

Swapnil S

मुंबई : मध्य रेल्वेच्या उपनगरीय विभागावर आज (२२ फेब्रुवारी) अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. मुख्य मार्गावर मुलुंड आणि ठाणे स्थानकांदरम्यान सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत अप आणि डाऊन धीम्या मार्गावर ब्लॉक असेल, तर हार्बर मार्गावर पनवेल ते वाशी स्थानकांदरम्यान ब्लॉक असणार आहे.

मुख्य मार्ग :

मुख्य मार्गावर सीएसएमटीहून सकाळी १०.०४ ते दुपारी ३.०९ वाजेपर्यंत सुटणाऱ्या डाऊन धीम्या मार्गावरील सेवा मुलुंड आणि ठाणे स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवल्या जातील. या गाड्या ठाणे स्थानकावर डाऊन धीम्या मार्गावर पुन्हा वळवल्या जातील आणि त्यांच्या नियोजित वेळेपेक्षा १० मिनिटे उशिरा पोहोचतील. कल्याणहून सकाळी १०.३६ ते दुपारी ३.२४ वाजेपर्यंत सुटणाऱ्या अप धीम्या गाड्या ठाणे आणि मुलुंड स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळवल्या जातील आणि मुलुंड स्थानकावर अप धीम्या मार्गावर पुन्हा वळवल्या जातील आणि त्या वेळापत्रकापेक्षा १० मिनिटे उशिरा पोहोचतील.

हार्बर मार्ग :

हार्बर मार्गावर पनवेल आणि वाशी स्थानकांदरम्यान (पोर्ट मार्ग वगळता) अप आणि डाऊन मार्गावर सकाळी ११.०५ ते सायंकाळी ४.०५ वाजेपर्यंत ब्लॉक असेल. ब्लॉक कालावधीत पनवेलहून सीएसएमटीला जाणारी अप हार्बर मार्गावरील सेवा सकाळी १०.३३ ते दुपारी ३.४९ वाजेपर्यंत आणि सीएसएमटीला जाणारी डाउन हार्बर मार्गावरील सेवा सकाळी ९.४५ ते दुपारी ३.१२ वाजेपर्यंत रद्द राहतील. तर ट्रान्स हार्बर लाइन सेक्शनवर पनवेलहून ठाण्याकडे जाणारी अप ट्रान्स-हार्बर लाइन सेवा सकाळी ११.०२ ते दुपारी ३.५३ पर्यंत आणि पनवेलहून निघणाऱ्या डाऊन ट्रान्स-हार्बर लाइन सेवा सकाळी १०.०१ ते दुपारी ३.२० पर्यंत रद्द राहतील. तर ब्लॉक काळात सीएसएमटी मुंबई-वाशी सेक्शनवर विशेष लोकल चालवल्या जातील. तसेच ब्लॉक काळात ठाणे-वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्स-हार्बर लाइन सेवा उपलब्ध असतील.

"व्हिडीओ पाहायला आमच्याकडे वेळ नाही"; CJP आंदोलकांच्या याचिकेवर सरन्यायाधीश सूर्य कांत यांचे भाष्य, तातडीच्या सुनावणीस नकार

Badlapur : साडी आणली नाही म्हणून थेट नवऱ्याचा घेतला जीव; पत्नी अटकेत

"जयंती म्हणून मानताना मन तुटून जातंय..."; अजितदादांच्या आठवणीत सुनेत्रा पवारांची भावनिक पोस्ट

Mumbai Rain Alert : मुंबईत मुसळधार पावसासह भरतीचाही धोका; वादळी वाऱ्याचा इशारा, नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

Mumbai : उड्डाणपूल, भुयारी मार्ग, स्कायवॉकचे जाळे विस्तारणार; महापालिका सल्लागाराची नियुक्ती करणार